कॅटरिना विकीच्या लग्नातील खास फोटो शूट, कॅटरिनाची साडी बनवायला ४० कारागिरांना १८०० तास लागले


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कॅटरिना कैफ आणि विकि कौशल ह्यांच्या लग्नाच्या चर्चा अजूनही रंगलेल्या आहेतच. ह्यांच्या लग्नातील हळदीचे, मेहेंदीचे, लग्नाचे फोटो त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.आता आणखी एक स्पेशल फोटोशूटचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. कॅटरिना कैफची आई ही ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन लग्नात पांढऱ्या रंगाचा, लॉंग टेल गाऊन नवरी परिधान करते.

Special photo shoot of Katrina Vicky’s wedding

कॅटरिना कैफने पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न केले. म्हणून आपल्या आईला tribute देण्यासाठी म्हणून तिने खास सब्यसाची यांनी तिचे ख्रिश्चन पाश्र्वभूमी लक्षात घेऊन एक साडी डिझाइन केली होती. ह्या साडी मधील केलेले फोटो शूटचे फोटो कॅटरिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.


कॅटरिना कैफ आणि विकि कौशलच्या लग्नातील मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो


स्पेशल इंग्लिश फुलांचे एम्ब्रॉयडरी काम असणारी ही साडी 40 कारागिरांनी बनवली आहे. ही साडी तयार करायला एकूण 1800 तास लागले होते. सब्यसाची यांनी आपल्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. या फोटो शूट मध्ये विकिने स्पेशल बंगलोर सिल्क विथ एम्ब्रॉयडरी वर्क वाली शेरवानी परिधान केली आहे.

ह्या दोघांचे हे फोटो शूट एकदम क्लासि फोटोशूट आहे. तुम्ही पाहिले का हे फोटोज?

Special photo shoot of Katrina Vicky’s wedding

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था