विजय पर्व समारंभात राजनाथ सिंह यांच्या “या” नम्रतेने शूरवीर सैनिक भारावले!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या 1971 मधील युद्धात पाकिस्तानवरच्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धानंतर स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती भारताने केली. या सुवर्णमहोत्सवी विजय पर्वाचा सांगता समारंभ आज नवी दिल्लीत झाला, त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका कृतीने या समारंभात उपस्थित असलेले सर्व सैनिक भारावले भारावून गेले.Rajnath Singh’s “Yaa” humility overwhelmed the brave soldiers in the victory ceremony

राजनाथ सिंह यांनी 1971 च्या युद्धात शौर्य गाजवलेल्या करणार कर्नल होशियार सिंग यांच्या पत्नीला चरणस्पर्श करून नमस्कार केला. त्यावेळी सर्व सैनिकांनी राजनाथ सिंग यांच्या नम्रतेने बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.



कर्नल होशियार सिंग यांनी 1971 च्या युद्धात जे शौर्य गाजवले त्याबद्दल त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नींना संरक्षण दलाने आज सन्मानपूर्वक विजय पर्व समारंभात निमंत्रण दिले होते. या समारंभाला त्या उपस्थित होत्या.

सर्व वीर योद्धा यांची राजनाथ सिंह भेट घेत असताना त्यांची ओळख कर्नल होशियार सिंग यांच्या पत्नीशी करून देण्यात आली. तेव्हा त्यांनी खाली वाकून त्यांचा चरणस्पर्श करत नमस्कार केला. राजनाथ सिंह यांच्या नम्र कृतीमुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्व वीर योद्धे आणि सैनिक भारावून गेले.

Rajnath Singh’s “Yaa” humility overwhelmed the brave soldiers in the victory ceremony

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात