Chief Minister Yogi : पोटनिवडणुकीच्या विजयाने विरोधक घाबरले – मुख्यमंत्री योगी

Chief Minister Yogi

2027 मध्ये भाजपचा विजय आणखी मोठा असणार असंही योगींनी म्हटलं आहे.


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : Chief Minister Yogi उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी भाजपच्या मुख्यालयात पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार समारंभाला संबोधित केले. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित आमदार, पक्षाचे कार्यकर्ते, मंत्री आणि अधिका-यांनी पोटनिवडणुकीत दिलेली जबाबदारी पार पाडण्यात मेहनत आणि समर्पण केल्याबद्दल कौतुक केले.Chief Minister Yogi



आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, संघभावना आणि एकजुटीने काम केल्यास अशक्यही शक्य होते. विरोधकांवर निशाणा साधत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, पोटनिवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयामुळे विरोधी पक्ष घाबरले आहेत. आता ते फक्त आरोप करू शकतात. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणखी मोठा विजय मिळवेल, अशी ग्वाही त्यांनी सर्वांना दिली.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली एनडीएने हरियाणामध्ये हॅट्ट्रिक केली, महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळवले आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत 9 पैकी 7 जागा जिंकल्या.

Opposition scared by by-election victory Chief Minister Yogi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात