सरसंघचालकांच्या उपस्थितीत पुण्यात 16 डिसेंबरला मोफत दिव्यांग शिबिर; 1000 दिव्यांगांना सेवालाभा देण्याचे टार्गेट!!


– खराडीतील ढोले पाटील महाविद्यालयात शिबिराचे होणार आयोजन Free camp for the disabled on December 16

विशेष प्रतिनिधी

पुणे : भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय आणि हात आणि कॅलिपर मोफत बसविण्यासाठी राज्यस्तरीय दिव्यांग शिबिर पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे.

सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी खराडी येथील ढोले पाटील कॉलेज, इऑन आयटीपार्क जवळ हे शिबिर होणार असून
संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष दत्ता चितळे यांनी दिली.

भारत विकास परिषद ही सेवा आणि संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविणे हा प्रमुख राष्ट्र‌व्यापी सेवा प्रकल्प आहे. भारतातील 13 विकलांग केंद्रांपैकी पुण्यात एक केंद्र कार्यरत असून, कायमस्वरूपी असलेले हे केंद्र गेल्या 25 वर्षापासून अखंड कार्यरत आहे. कोणत्याही सरकारी मदती शिवाय समाजाच्या आधारावर दरवर्षी सुमारे 5000 दिव्यांगांना याचा लाभ होत आहे, असे चितळे यांनी सांगितले.

संस्थेचे विश्वस्त आणि केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी यावेळी शिबिराच्या आयोजनाबाबत माहिती दिली. गेल्या 5 वर्षापासून परंपरागत जयपूर फूट ऐवजी 50000 रुपयांचा अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय आणि हात आणि पोलिओ कॅलिपर मोफत बसविण्यात येतात. पुण्यातील यंदाच्या या शिबिरात 1000 दिव्यांगांना सेवालाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. लाभार्थींना कोणतेही आर्थिक निकष नसून राज्यातील सर्व होतकरू दिव्यांग यात सहभागी होऊ शकतात.

मोफत दिव्यांग शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी स्वतः पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी संपर्क : साठे 9175558356,
अनिकेत 9422797106, राजेंद्र 8551064204

सोमवारी 16 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. पू. सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांची दिव्यांग शिबिरास भेट आणि रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन होईल. सर्व सेवा भावी नागरिकांनी या जाहीर कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

या शिबिरासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.,ब्रिज नेक्स्ट, ऑटो हँगर, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, वात्सल्य ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांचा आर्थिक सहयोग लाभलेला आहे.

अधिक माहितीसाठी : विश्वस्त आणि विकलांग केंद्रप्रमुख विनय खटावकर 9326730666

Free camp for the disabled on December 16

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात