ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळाची तयारी तर काँग्रेस म्हणते ज्यांना जायचं असेल तर तो त्यांचा निर्णय
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2024 मधील पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडताना दिसत आहे. शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते अंबादास दानवे यांनी युतीपासून फारकत घेऊन निवडणूक लढविण्याची चर्चा केली आहे. त्याला उत्तर देताना काँग्रेसचे नाना पटोले म्हणतात की, कोणाला आघाडीतून बाहेर पडायचे असेल तर तो त्यांचा निर्णय असेल. महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालापासून विरोधी पक्षनेते सतत ईव्हीएम छेडछाडीवर बोलत आहेत आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंचा पक्षाकडून स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्याच्या अंबादास दानवे यांच्या विधानावर टीका केली की, आम्हाला आमच्या मित्रपक्षांना सोबत ठेवायचे आहे, तर कुणाला बाहेर जायचे असेल तर तो त्यांचा निर्णय असेल.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि अमित शहा यांच्या दिल्लीतील बैठकीबाबत नाना पटोले म्हणाले, “महायुतीला बहुमत मिळाले, तरीही ते लवकर सरकार स्थापन करू शकलेले नाहीत. त्यांची मिटींग महाराष्ट्रासाठी नाही, तर महाराष्ट्राला कोण लुटणार? हे ठरवण्यासाठी आहे. कारण, त्यांना ना महाराष्ट्राची काळजी आहे ना जनतेच्या समस्यांची.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील पराभवानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत सायंकाळी 5.30 नंतर 76 लाखांहून अधिक मतदान झाल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. हे कसे घडले? निवडणूक आयोगाने पुरावे द्यावेत. याविरोधात काँग्रेस आंदोलन करणार असून कायदेशीर लढाही लढणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App