हेट स्पीच : नुपूर शर्माला एक “न्याय” उदयनिधीला दुसरा न्याय!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा मुलगा उदयनिधी याने सनातन धर्माला डेंगी, मलेरिया, कोरोना म्हटले. सनातन धर्माच्या निर्मूलनाची उर्मट भाषा वापरली, पण या निमित्ताने नुपूर शर्मा आणि उदयनिधी यांच्या दोन हेट स्पीचचे परिणाम आणि त्यातला भेद अधोरेखित झाला. One justice for nupur Sharma for her hate speech and another justice for udayanidhi stalin hate speech

2022 मध्ये नुपूर शर्मांनी एका टीव्ही डिबेट मध्ये मोहम्मद पैगंबर विषयी काही उद्गार काढले आणि ताबडतोब देशातच काय पण परदेशातही नुपूर शर्मांविरुद्ध केवळ असंतोषच नाही, तर संताप उफाळून आला. इस्लामिस्टांना संधी मिळाली आणि त्यातूनच त्यांनी सर तन से जुदाची घोषणा दिली. नुपूर शर्मांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. देशभरात इस्लामिस्टांनी मोठ – मोठ्या रॅली काढून धार्मिक दहशत निर्माण केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्लामिक देशांचा दबाव भारतावर वाढला.

इतकेच नाही, तर राजस्थानात कन्हैयालाल आणि महाराष्ट्रात उमेश कोल्हे या दोन हत्या झाल्या.

एकीकडे नुपूर शर्मा आजही सर तन से जुदा या धमकीच्या सावटाखाली वावरते आहे. सार्वजनिक समारंभांमध्ये सहभागी होऊ शकत नाही. जिथे जाईल तिथे जीवे मारण्याची भीती आहे. इतके सगळे घडल्यानंतर आजही नुपूर शर्माला कुठूनच कुठल्याच इको सिस्टीमचे बँकिंग नाही.

पण नुपूर शर्माच्या पार्श्वभूमीवर उदयनिधी स्टालिनला मात्र तशाच स्वरूपाचे हेट स्पीच देऊनही ताबडतोब इको सिस्टीमचे बॅकिंग मिळाले आहे. सनातन धर्म कसा भेदभावी आहे, जातीपातींमध्ये विखुरल्याने कसा उच्चनीच भाव तिथे आजही मूळ धरून आहे, यासाठी इको सिस्टीम मधल्या शेकडो विचारवंतांनी उदयनिती स्टॅलिन भोवती “वैचारिक सुरक्षा कवच” उभारले.

नुपूर शर्मा तर फक्त टीव्ही डिबेट मध्ये बोलल्या होत्या. त्याविषयीचे फॅक्ट चेक करण्याची तसदी कोणी घेतली नाही, पण ताबडतोब सर तन से जुदा च्या घोषणा होऊन इस्लामिस्टांनी देश पेटवण्याचा प्रयत्न केला होता. इकडे उदयनिधीने उघडपणे सनातन धर्माला डेंगी मलेरिया, कोरोना, संबोधले. त्यांच्या समर्थनासाठी तुझी घोटाळ्यातला मुख्य आरोपी ए. राजा समोर येऊन सनातन धर्माला एचआयव्ही आणि कुष्ठरोग ठरवून मोकळे झाले. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी देखील उदयनिधींचे समर्थन केले. उदयनिधी ट्रोल व्हायला लागतातच त्यांच्याभोवतीचा बंदोबस्त वाढवला.

पण उदयनिधी निधीच्या वक्तव्याविरोधात एक दोन ठिकाणी झालेली निदर्शने वगळता बाकी कुठेही त्याचे साधे पडसादही उमटले नाहीत. किंबहुना आजही उदयनिधी आपल्या सनातन धर्माच्या टीकेवर ठाम असताना त्यांच्याविरुद्ध कुठलीही सर तन से जुदाची धमकी कोणी दिलेली नाही. अयोध्येतील एका महंतांनी त्यांची जीभ कापण्याची धमकी दिली, मात्र त्यांच्याविरुद्ध ताबडतोब गुन्हा दाखल झाला.

नुपूर शर्माच्या टीव्ही डिबेट मधल्या एका वक्तव्यावर एका वक्तव्यावर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेत त्याविषयी कायदेशीर कारवाई सुरू केली. पण उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी बेलगाम उद्गार काढल्यानंतर त्यांच्यावर अद्याप हेट स्पीच विषयी सुप्रीम कोर्टाने कोणती कारवाई सुरू केली नाही.

नुपूर शर्मा आणि उदय निधी यांची वक्तव्य पब्लिक डोमेन मध्ये आहेत. ती हेट स्पीच या निकषात बसतात की नाही हे समान पातळीवर बघण्याची गरज असताना प्रत्यक्षात नुपूर शर्माच्या बाबतीत सर तन से जुदा घोषणा अंमलात आणण्याचाही प्रयत्न झाला, पण त्याचवेळी उदयनिधी बाबत मात्र बौद्धिक सुरक्षा कवच उभारून इको सिस्टीम सनातन धर्माला अधिकाधिक बदनाम करू पाहत आहे, ही भारतातली आजची वस्तुस्थिती आहे.

One justice for nupur Sharma for her hate speech and another justice for udayanidhi stalin hate speech

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात