Tripura Bypolls Result 2023: त्रिपुरामध्ये भाजपचा दणदणीत विजय, धनपूर-बॉक्सानगर जागा ताब्यात


बॉक्सानगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार तफज्जल हुसेन 30 हजार 237 मतांनी विजयी झाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

धनपूर :  सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यासाठीचे मतदान ५ सप्टेंबर रोजी शांततेत पार पडले. दुसरीकडे भाजपने त्रिपुराच्या धनपूर आणि बॉक्सानगर जागा जिंकल्या आहेत. Tripura Bypolls Result 2023 BJPs resounding victory in Tripura, Dhanpur Boxanagar seats in control

धनपूरमधून भाजपा उमेदवार बिंदू देबनाथ यांनी माकप उमेदवार कौशिक चंद्रा यांचा १८ हजार ८७१ मतांनी पराभव केला. देबनाथ यांना 30017 मते मिळाली, तर कौशिक यांना केवळ 11146 मतांवर समाधान मानावे लागले. बॉक्सानगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार तफज्जल हुसेन 30 हजार 237 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ३४४१६ मते मिळाली, तर माकपचे उमेदवार मिझान हुसेन यांना केवळ ३९०९ मते मिळाली.

5  सप्टेंबर रोजी पश्चिम बंगाल, झारखंड, त्रिपुरा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या सात जागांवर पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकांना भारतीय जनता पक्ष (भाजप) विरुद्ध विरोधी पक्षांची  आघाडी असलेल्या ‘INDIA पहिली निवडणूक चाचणी’ म्हटले जात आहे. 5 सप्टेंबर रोजी त्रिपुरा, बॉक्सानगर आणि धनपूर या दोन जागांसाठी, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी, उत्तराखंडमधील बागेश्वर आणि उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभेच्या जागेसाठी मतदान झाले होते.

Tripura Bypolls Result 2023 BJPs resounding victory in Tripura Dhanpur Boxanagar seats in control

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात