प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे इंग्लंडच्या संग्रहालयातून भारतात येणार आहेत. The tiger nail used by Shivaji Maharaj to kill Afzal Khan will return to his homeland from England
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध करण्यासाठी जी वाघनखे वापरली होती, ती सध्या ब्रिटनमध्ये आहेत. त्यासह महाराजांची जगदंबा तलवारही ब्रिटनमध्येच आहे. राज्य सरकार मागील अनेक काळापासून ही तलवार आणि वाघनखे मायभूमीत परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं दिसत आहे. कारण ब्रिटनने वाघनखं परत करण्यास तयारी दर्शवली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी यांनी ही माहिती दिली आहे.
ब्रिटनने वाघनखं आपल्याला परत करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात आपण इंग्लंडला जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ही वाघनखं सध्या अल्बर्ट म्युझिअममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. सुधार मुनगंटीवार यावेळी विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझिअमसह सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे की “जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर वाघनखं यावर्षीच पुन्हा महाराष्ट्रात परत येतील. आम्हाला युके प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत करण्यास तयार असल्याचं पत्र मिळालं आहे. हिंदू कॅलेंडप्रमाणे ज्या दिवशी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता, त्या दिवशीच ही वाघनखं परत आणली जातील. याशिवाय इतर तारखांचाही विचार केला जात आहे. तसंच वाघनखं भारतात परत कशी आणायची यावरही चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App