TCS corporate Jihad : मास्टरमाईंड निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक कोर्टाने फेटाळला; अत्यंत गंभीर गुन्हा केल्याचे निरीक्षण!!

– मालेगावात धर्मांतराचे रॅकेट, निदा खानच्या सुनावणी दरम्यान तपासात धक्कादायक वास्तव समोर!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून तिने अत्यंत गंभीर गुन्हा केला आहे असे परखड निरीक्षण नोंदविले. सरकारी वकील अजय मिसर यांनी ही माहिती दिली.

मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली, त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून तिने तिच्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले. त्यानुसार कोर्टाने आज निकाल देत तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे तिची आता अटक अपरिहार्य झाली आहे. निदा खान हिने अत्यंत गंभीर गुन्हा केला. तिने मुलींना फुस लावली. त्यांच्याकडून काही वेगळी कृत्ये करवून घेतली, पोलिसांनी न्यायालयात ही माहिती दिली. ती न्यायालयाने मान्य केली. या सर्व प्रकरणाच्या पुढच्या तपासासाठी तिला अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले.

– मालेगावात धर्मांतराचे रॅकेट

मालेगावातील एक टीम धर्मांतरासंबंधी सर्व कागदपत्रे तयार करून निदा खान हिला आणि तिच्या टीमला देत होती. त्यातूनच धर्मांतराचे मोठे रॅकेट चालवले जात होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिल्याची माहिती या प्रकरणातले वकील अजय मिसर यांनी सांगितले.

अजय मिसर म्हणाले, “आधीची सुनावणी केवळ निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जापुरतीच मर्यादित होती. न्यायालयाने दानिश आणि निदा खान यांच्या कारवायांची वैयक्तिकरित्या तपासणी केली. तपासात सध्या केवळ एवढेच उघडकीस आले आहे की, मालेगावमध्ये एक टीम आहे जिने धर्मांतरासाठी कागदपत्रे तयार केली. तपास प्राथमिक टप्प्यात आहे. यामध्ये मूलतः हिंदू धर्माच्या श्रद्धांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून तक्रारदाराच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. हे आरोप जबरदस्तीचे आणि शारीरिक होते, आरोपीने लग्नाच्या नावाखाली हे सर्व घडले आहे. हे सर्व तपासादरम्यान उघड होईल.

On TCS Nashik Case, Public Prosecutor Ajay Misar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात