“भीतर – बाहर” अश्लील भाषा वापरत नितीश कुमारांनी भर विधानसभेत ओलांडली सभ्यतेची मर्यादा!!

वृत्तसंस्था

पाटणा : “भीतर – बाहर” म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भर विधानसभेत आज मर्यादा पार केली. जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बोलताना नितीश कुमार यांनी सेक्स एज्युकेशन या विषयावर भाषण ठोकले. पण ते भाषण करतानाच “लडकी पढ लेगी तब पुरुष को भीतर मत घुसाने देगी, उसको बाहर ही करवाने देगी,” अशी अश्लील भाषा वापरली. नितीश कुमार यांच्या या भाषणाचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले आणि त्यांच्यावर अनेकांनी टीकास्त्र सोडले. Nitish Kumar crossed the limits of civility by using obscene language in the Assembly

लोकसंख्या कमी होत आहे. कारण मुली शिकत आहेत आणि त्या नवऱ्यांना जास्त काळ सेक्स करू देत नाहीत. आता बिहारमध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण 2.9 टक्क्यांवर आहे, ते लवकरच 2 टक्क्यांपर्यंत खाली येईल, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. मात्र ही माहिती सभ्य भाषेत त्यांनी दिली नाही, तर सेक्स एज्युकेशनचा क्लास भर विधानसभेत लावला, तो देखील अश्लील भाषेत!! नितीश कुमार यांचे भाषण चालू असताना त्यांच्या शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य हसत होते. नितीश कुमार यांनी सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचे भान आमदारांना राहिले नव्हते.

“लडका लडकी की जब शादी होती है, तो लडका रोज रात को करता है. अगर लडकी पढ लेगी, तो लडके को भीतर घुसाने नही देगी. वह तो करेगाही, लेकिन उसको बाहर करवाने देगी,” अशी भाषा नितीश कुमारांची यांनी वापरली. त्यावेळी विधानसभेच्या गॅलरीत बसलेल्या पत्रकारांना उद्देशून तुम्ही देखील हा मुद्दा समजून घ्या, असे त्यांच्याकडे पाहून सांगितले.

नितीश कुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचा पारा चढला. विशेषत: महिलांचा प्रचंड संताप झाला. लोकसंख्या वाढीसारख्या महत्त्वाच्या विषयावर नितीश कुमार यांच्यासारख्या 75 वर्षांचा मुख्यमंत्री अश्लील भाषा वापरतो, याचा महिलांनी निषेध केला. बिहारची मान संपूर्ण देशात त्यांनी खाली घातली. मुख्यमंत्र्यांच्या बेशरम भाषणाने महिलांनाही अपमानित वाटले, अशा कमेंट अनेक महिलांनी केल्या.

Nitish Kumar crossed the limits of civility by using obscene language in the Assembly

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात