विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंसक परिस्थिती आणि देशातील पूर्वोत्तर राज्यांमधील अस्वस्थता या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलून मणिपूरच्या राज्यपाल पदी माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, तर मिझोरामच्या राज्यपाल पदी माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांची नियुक्ती केली.Governor
मणिपूर मधील मैतेई विरुद्ध कुकी वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजय कुमार भल्ला (ajaykumar bhalla ) यांच्यासारख्या अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याची राज्यपाल पदी नियुक्ती करणे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. अजय कुमार भल्ला हे 2019 ते 2024 केंद्रीय गृहसचिव पदी होते. मणिपूर मधल्या संघर्षाचे सगळे बारकावे त्यांना माहिती आहेत. त्याचबरोबर त्यावर करायचा उपाय योजना यांची त्यांना सखोल जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष राज्यपाल पदी त्या राज्यात काम करून स्थिती सामान्य करावी, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
राष्ट्रवादीतल्या सत्ता लालसेची सरकारला डोकेदुखी; तिथे लागू कशी करणार “मात्रा फडणविशी”??
जनरल व्ही. के. सिंह हे लष्करप्रमुख पदावर तर होतेच, त्याचबरोबर त्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 5 वर्षे काम केल्याने राजकीय पदावर राहून कसे काम करायचे याची त्यांना आता पुरती माहिती झाली आहे. त्यांच्या अनुभव आणि सेवेचा लाभ मिझोराम सारख्या राज्यामध्ये करवून घेण्याचा मोदी सरकारचा इरादा आहे.
मणिपूर आणि मिझोराम ही राज्य बांगलादेशच्या सीमेवरचे राज्य असून सध्या बांगलादेशातली हिंसक परिस्थिती आणि त्यामुळे तिथून होणारे स्थलांतर या पार्श्वभूमीवर या दोन राज्यांमध्ये केंद्रीय पातळीवर अतिशय वरिष्ठ पदांवर काम केलेले दोन अधिकारी त्या राज्यांमध्ये राज्यपाल बनून येणे याला विशेष महत्त्व आहे.
– बिहार – केरळ मध्ये अदलाबदल
बिहार आणि केरळ या दोन राज्यांमध्ये राज्यपालांची अदलाबदल केली असून केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना बिहारमध्ये पाठविण्यात आले आहे, तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची केरळच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App