नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिले स्थान मिळवून इतिहास रचला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार पदार्पण केले आहे. त्याने पात्रता फेरीत पहिला थ्रो 89.34 मीटर केला. हा त्याचा या हंगामातील सर्वोत्तम थ्रो आहे. नीरजने पहिल्याच थ्रोसह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.59 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजचा अंतिम सामना 8 ऑगस्ट रोजी रात्री 11.50 वाजता होणार आहे. त्याला सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिले स्थान मिळवून इतिहास रचला होता.
मंगळवारी ब गटातील पात्रता फेरीत चोप्राने 89.34 मीटर फेक करून शानदार सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. त्याच्यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही अंतिम फेरी गाठली. त्याने पहिल्याच प्रयत्नात पात्रता मानक अंतर देखील पार केले. नदीमने 86.59 मीटर अंतर नोंदवले. नदीमने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 90 मीटरचा टप्पा ओलांडला होता.
दुसरीकडे, भारताचे किशोर जेना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकीच्या पात्रता फेरीत 84 मीटरचा टप्पा पार करू शकले नाहीत. जेनाने 80.73 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पात्रता फेरी पूर्ण केली आणि आपल्या पहिली ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more