विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – नॅशनल कॉन्फरन्सचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे जम्मू विभागाचे माजी अध्यक्ष देवेंदर राणा आणि सुरजित सिंह स्लाथिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या येथील मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, हरदीपसिंग पुरी आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.National conference leaders joined BJP
माजी आमदार असलेले देवेंदर राणा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे कनिष्ठ बंधू आहेत. त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू आणि काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे राजकीय सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे.
भाजपचे जम्मू आणि काश्मिर प्रभारी सरचिटणीस तरूण चुग आणि जम्मू व काश्मिर विभागप्रमुख रविंदर रैना यांनी त्यांचे स्वागत केले. संपूर्ण जम्मू आणि काश्मिरऐवजी केवळ जम्मूला स्वतंत्र राज्याचा दर्जा पुन्हा देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांनी जम्मू घोषणापत्र जारी केले आहे. राणा त्याचा पुरस्कार करत आहेत. केंद्र सरकारने २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मिरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करत केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App