जगातील सर्वात प्रभावशाली महिलां पैकी एक, पेप्सीकोच्या माजी सीइओ इंद्रा नुयी यांच्या बद्दल थोडंस…


‘I can do dam good job too’  इंद्रा नुयी ह्यांचे हे वाक्य बऱ्याच लोकांसाठी आता एक इन्स्पिरेशनल बनलं आहे. मद्रासच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पेप्सीकोच्या सीइओ बनण्यापर्यंत अजिबात सोपा न्हवता. घरातील लग्नासाठीचा आग्रह, मुलगी एकटी अमेरिकेत कशी जाणार, लग्नानंतर काय करायचे ते कर पण आधी लग्न कर, अमेरिकेत शिकायला गेल्यानंतर कोणी हिच्या सोबत लग्न करणार नाही, अमेरिकेत जाऊन वाईट व्यसनं लागली तर अश्या अनेक प्रश्नांचा सामना करणे हे काही साधे काम नाही. पण इच्छा आहे तिथे मार्ग आहे. इंद्रा नुयी यांनी अश्या अनेक अडचणींवर मात करत आपला यशाचा मार्ग स्वतः बनवला. चला तर जाणून घेऊयात इंद्रा नुयी यांच्या बद्दल….

इंद्रा नुयीयांचे बालपण :

इंद्रा नुयी यांचा जन्म मद्रास मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांच्या घरचे वातावरण अगदी पारंपरिक होते. त्यांचे वडील बँकमध्ये नोकरी करायचे तर आई हाउसवाइफ होती. जरी त्यांची घरीच असायची पण त्यांच्या आईने त्यांना मोठी स्वप्ने पाहायला आणि ती साकार करायला शिकवले. ‘मोठे झाल्यानंतर तुला देशाचे पंतप्रधान व्हायचे असेल तर डोळे बंद करून आपण देशाचे पंतप्रधान झालो आहोत असे इमॅजीन करायचे. जरी ती पंतप्रधान नाही झालीस तरी मोठी स्वप्न पाहण्याचा विश्वास आयुष्यात बाकी काही कमी पडू देणार नाही’ इंद्रा नुई यांची आई त्यांना लहानपणी असे सांगायची. तेव्हापासूनच त्यांनी स्वप्न पाहायला आणि स्वप्नांमध्ये बळ, हिम्मत, ताकद निर्माण करायला त्या शिकल्या होत्या.

इंद्रा नुयी यांचे शिक्षण :

नूई यांनी 1974 मध्ये मद्रास विद्यापीठाच्या मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयातून पदवी मिळवली होती. ज्या काळात एमबीए ह्या पदवी बद्दल कोणालाही कल्पना न्हवती. आणि सर्व जण ग्रॅज्युएशननंतर टीचिंग आणि रिसर्च नोकर्यांच्या मागे धावत होते. तेंव्हा इंद्रा नुई यांनी 1976 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता येथून एमबीए ही पदवी संपादन केली होती.

1978 मध्ये नूई यांना येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्या अमेरिकेत गेल्या. जिथे त्यांनी 1980 मध्ये सार्वजनिक आणि खाजगी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळवली.

करियरचा सुरुवातीचा काळ :

नोकरीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी एका टेक्स्टाईल कंपनीमध्ये जॉब केला. त्यानंतर त्यांनी जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीमध्ये जॉब केला. तो जॉब सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा टेक्स्टाईल कंपनी जॉइन केली. पण कोणत्याही कंपनीमध्ये त्यांना म्हणावी तशी प्रगती होण्याची संधी मिळाली नाही. किंवा त्यांच्या मोठय़ा स्वप्नांना साकार करण्यासाठीच त्यांनी त्या कंपन्यांमधील जॉब सोडला. आणि त्यांनी १९९४ साली त्यांनी पेप्सिको ही कंपनी जॉइन केली. २००६ साली त्या पेप्सीको कंपनीच्या सीईओ बनल्या.

पेप्सीको मधील प्रवास :

२००१ मध्ये त्यांनी पेप्सिकोची चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून सूत्रे हातात घेतली होती. त्याच वर्षी त्यांना पेप्सिकोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये देखील सामील करून घेण्यात आले होते. इथून पुढचा इतिहास तर तुम्हा सर्वां समोरच आहे. त्यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर पेप्सीकोच्या नफ्यात दुपटीने वाढ झाली.

नूई या कंपनीच्या ग्लोबल स्ट्रॅटेजी च्या डिरेक्टर म्हणून एका दशकाहून अधिक काळ काम केले होते. पेप्सिकोच्या पुनर्रचनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. 1997 मध्ये ट्रायकॉन डायव्हर्सिटी अंतर्गत पेप्सीको कंपनीचा जगातील 3 सर्वात मोठ्या ब्रँड सोबत करार केला. पिझ्झा हट, केएफसी आणि टॅको बेल या कंपन्यांसोबतचा करार हा गेम चेंजर ठरला. 1998 मध्ये इंद्रा नुयी यांनी ट्रॉपिकाना कंपनीला पेप्सीको मध्ये मर्ज करून घेतले. सोबत क्विकर ओट्स कंपनी आणि गॅटोरेड या कंपणींचाही समावेश होता.

मीडिया रेकग्नायझेशन :

वॉल स्ट्रीट जर्नलच्या 2007 आणि 2008 च्या जर्नलमध्ये 50 प्रभावशाली महिलांच्या यादीत नूयी यांचे नाव होते. तसेच 2007 आणि 2008 मध्ये टाइमच्या 100 सर्वात प्रभावशाली लोकांमध्येही त्यांच्या नावाचा समावेश होता. 2008 मध्ये फोर्ब्सने त्यांना सर्वात शक्तिशाली महिला म्हणून सन्मानित केले.

2009 आणि 2010 या वर्षीही त्यांनी फोर्ब्ज मासिकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश होता. 2015 सालच्या फॉर्च्यून ने प्रसिद्ध केलेल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुयी दुसऱ्या क्रमांकावर होत्या.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केलेली कामे :

पर्यावरनाची चिंता आणि पर्यावरणाचे संरक्षण, कचरा कमी करण्यासाठी पॅकेजिंगच्या रिसायकलिंगची सोय करणे, पाण्याचे संरक्षण करणे, अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्राधान्य देणे, रिसायकलिंग यासारख्या पर्यावरण पूरक गोष्टींवर काम करण्यास नेहमीच त्यांचा भर राहिला आहे.

6 ऑगस्ट 2018 साली त्यांनी पेप्सीकोच्या सीइओ पदाचा राजीनामा दिला. त्यांनंतर त्यांनी आपले एक पुस्तक प्रकाशित केले आहे. माय वर्क इन फुल : वर्क, फॅमिली अँड अवर फ्युचर असे त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात