सिडनी – कोरोनाच्या जागतिक साथीमुळे प्रदीर्घ लॉकडाउनला सामोरे गेल्यानंतर सिडनीवासीयांसाठी अखेर १०८ वा दिवस सुदैवी ठरला. चार महिन्यांच्या कालावधीतील १०७ दिवस लागू राहिलेले निर्बंध उठविण्यात आल्यामुळे सिडनीवासीयांनी जल्लोष केला.Lockdown lifted from Sydney
आता लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी बहुतेक निर्बंध लागू नाहीत.आता लोकांना एकत्र भोजन करणे, जिममध्ये जाणे, ग्रंथालयास भेट देणे, तरणतलावावर जाणे अशा गोष्टी नेहमीसारख्या करता येईल. सर्वाधिक मोठ्या रांगा केशकर्तनालय आणि नखांच्या सलूनपाशी होत्या.
सोमवारी मध्य रात्रीपासूनच दुकाने आणि पब उघडण्यात आली. त्यामुळे तेथे नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. अनेक बाबतीत सिडनीवासीयांनी स्वातंत्र्य नव्याने अनुभवता आले. अनेकांनी प्रियजनांच्या भेटीगाठींचे नियोजन केले.
नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यासाठी प्रवास करण्याची संधीही अनेकांना मिळाली. याआधी विभागातून पाच किलोमीटरच्या पलिकडे सबळ कारणाशिवाय प्रवास करण्यास मनाई होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App