Aung San Suu Kyi : आँग सान स्यू की यांना म्यानमारमध्ये चार वर्षांचा तुरुंगवास, लष्कराविरुद्ध हिंसाचार भडकावल्याबद्दल दोषी ठरले


म्यानमारच्या एका न्यायालयाने दिग्गज नेत्या आंग सान स्यू की यांना लष्कराविरुद्ध असंतोष भडकावल्याप्रकरणी आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तत्पूर्वी, न्यायालय मंगळवारी निकाल सुनावणार होते. परंतु अतिरिक्त साक्षीदाराला साक्ष देण्याची परवानगी मिळाल्याने न्यायालयीन कामकाज तहकूब करण्यात आले. Myanmar’s ousted leader Aung San Suu Kyi sentenced to 4 years in prison reports


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : म्यानमारच्या एका न्यायालयाने दिग्गज नेत्या आंग सान स्यू की यांना लष्कराविरुद्ध असंतोष भडकावल्याप्रकरणी आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तत्पूर्वी, न्यायालय मंगळवारी निकाल सुनावणार होते. परंतु अतिरिक्त साक्षीदाराला साक्ष देण्याची परवानगी मिळाल्याने न्यायालयीन कामकाज तहकूब करण्यात आले.

नोबेल पारितोषिक विजेत्या 76 वर्षीय आंग सान स्यू की यांच्यावरही भ्रष्टाचारासह इतर अनेक आरोपांवर खटला सुरू आहे. आज त्यांना लष्कराविरुद्ध असंतोष भडकवल्याबद्दल आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे.



लष्कराने सत्ता उलथवली

स्यू की यांच्यावरील खटल्यांमध्ये त्यांची बदनामी करण्याचा आणि त्यांना पुढील निवडणूक लढवण्यापासून रोखण्याचे षड्यंत्र म्हणून पाहिले जाते. म्यानमानची राज्यघटना तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस उच्च पदावर बसण्यास किंवा खासदार-आमदार बनण्यास मनाई करते. नोव्हेंबरमध्ये झालेल्या म्यानमारच्या निवडणुकीत स्यू की यांच्या पक्षाने एकतर्फी विजय मिळवला होता, तर लष्कराशी संलग्न असलेल्या पक्षाला अनेक जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सैन्याने मतदानात हेराफेरीचा आरोप केला, परंतु स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांना तपासात कोणतीही मोठी अनियमितता आढळली नव्हती. यानंतर लष्कराने बंड करत लोकनिर्वाचित सत्ता उलथवून सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली.

सुरक्षा दलांच्या कारवाईत 1300 नागरिकांचा मृत्यू

स्यू की यांची लोकप्रियता कायम आहे आणि लोक अजूनही त्यांना लष्करी राजवटीविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक मानतात. लष्कराने सत्ता काबीज केल्याच्या विरोधात देशव्यापी निदर्शने झाली आणि सुरक्षा दलांनी ती निर्दयीपणे चिरडली. आकडेवारी दर्शवते की, सुरक्षा दलांच्या कारवाईत सुमारे 1300 नागरिक मरण पावले.

Myanmar’s ousted leader Aung San Suu Kyi sentenced to 4 years in prison reports

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात