शिवसेना उत्तर प्रदेशात काँग्रेसला “बूस्टर डोस” देणार; मराठी माध्यमांच्या बातम्यांमधून दावे!!


प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे राजकीय अस्तित्व पुसून टाकल्यानंतर शिवसेनेने मात्र याबाबत वेगळा सूर लावला आहे.Shiv sena will support congress in U P elections, sanjay raut to meet rahul and priyanka Gandhi soon, claimed mararthi media

काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे येत्या दोन दिवसांमध्ये काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेत ही जवळीक वाढत आहे, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.


शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी सोडला ‘संसद टीव्ही’ शो ‘मेरी कहानी’; राज्यसभेतील निलंबनानंतर तडकाफडकी राजीनामा


त्याच बरोबर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना काँग्रेसला राजकीय दृष्ट्या मदत करू शकते, असा दावाही या माध्यमांनी केला आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरणार आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेसारख्या दुसऱ्या हिंदुत्ववादी पक्षाचा उपयोग होऊ शकतो, असा काँग्रेस नेत्यांपेक्षा मराठी माध्यमांचाच दावा अधिक आहे. त्यामुळेच शिवसेना उत्तर प्रदेशात काँग्रेसला “बूस्टर डोस” देणार, अशा स्वरूपाच्या बातम्या या माध्यमांनी दिल्या आहेत.

– शिवसेना आणि इतर राज्ये

शिवसेना महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष म्हणून विशिष्ट ताकदवान असली तरी तिची ताकद ही ६० आमदारांच्या रेंजमध्ये आहे. भाजप बरोबर युती केल्यानंतर त्या पक्षाचे शिवसेनेचे ६० आसपास आमदार कायम निवडून आले आहेत. त्याचबरोबर लोकसभेत १० ते १५ या दरम्यान खासदार निवडून आले आहेत. परंतु, बाहेरच्या राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी राज्यांमध्ये शिवसेनेची ताकद ही माध्यमांमध्येच फक्त दिसते आहे.

बिहारच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला NOTA म्हणजे “वरीलपैकी कोणत्याही उमेदवाराला मत नाही” या मतांच्या संख्येपेक्षा कमी मते मिळाली आहेत. तरी देखील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शिवसेना मदत करणार. यासाठीच खासदार संजय राऊत हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत, अशा आशयाच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

Shiv sena will support congress in U P elections, sanjay raut to meet rahul and priyanka Gandhi soon, claimed mararthi media

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण