….तर रिपब्लिकन पक्ष राज्य सरकार विरोधात उतरून आंदोलन करेल ; रामदास आठवले यांनी राज्य सरकारला दिला इशारा


डॉ आंबेडकर लेखन व भाषण खंडाच्या ९ लाख प्रति प्रकाशित करण्यासाठी ५ कोटींचा खरेदी केलेला कागद धूळ खात पडला आहे. …. then the Republican Party will agitate against the state government; Ramdas Athavale warned the state government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे राज्य सरकारने तातडीने प्रकाशन करावे, अन्यथा आरपीआय कडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला

मुंबईत बोलताना केंद्रिय मंत्री आठवले म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. आणि त्यांचे साहित्य भाषण आणि लेखनाचे खंड प्रकाशित करण्यात महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करीत आहे.

पुढे आठवले यांनी सांगितले की , डॉ आंबेडकर लेखन व भाषण खंडाच्या ९ लाख प्रति प्रकाशित करण्यासाठी ५ कोटींचा खरेदी केलेला कागद धूळ खात पडला आहे.ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. आणि जर हे भाषण आणि लेखन खंडांचे साहित्य प्रकाशित करण्यात राज्य सरकारने दुर्लक्ष केले तर राज्य सरकार विरोधात रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा ईशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

…. then the Republican Party will agitate against the state government; Ramdas Athavale warned the state government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण