विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी 3.0 च्या पहिल्या 100 दिवसांत १५ लाख कोटींच्या योजनांना सुरुवात झाली आहे. आता आगामी 1100 दिवसांत पुन्हा इतक्याच रकमेच्या योजना सुरू होतील. म्हणजेच 200 दिवसांमध्ये 30 लाख कोटी रुपयांच्या योजनांवर खर्च करण्याची ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे.
दैनिक भास्करने पीएमओच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक मंत्रालयास मोठ्या प्रमाणात योजनांवर खर्च करण्यास सांगितले. जास्त पैसा पायाभूत सुविधा व शेतकरी-गरिबांवर खर्च होईल. पोर्ट कनेक्टिव्हिटी, नवे विमानतळ, ईव्ही, सेमीकंडक्टर, रस्ते, वाॅटर एअरपोर्ट, कृषी व कृषी उत्पादने, आरोग्य, शिक्षण, हॉस्पिटॅलिटीसाठी आगामी १०० दिवसांत नव्या घोषणा होतील. जगभरातील पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकदार मोठ्या गुंतवणुकीसाठी संभाव्य ठिकाणे शोधत आहेत. म्हणून १०० दिवसांत सुरू झालेल्या १५ हजार कोटींच्या योजना पुढील १०० दिवस सुरू ठेवणे गरजेचे आहे.
Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निरंतर चालू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
बंदर क्षेत्र ५० हजार कोटी रस्त्यांची सुधारणा, नवे मार्ग ५८ हजार कोटी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर,न्यू सिरीज ट्रेन ४२ हजार कोटी अर्धा डझन नवे विमानतळ २८ हजार कोटी १२ राज्यांत इंडस्ट्रियल हब १ लाख कोटी एमएसपी १२ हजार कोटी पीएम सूर्यघर १६ हजार कोटी वाॅटर एअरपोर्ट ४२ हजार कोटी
हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, आदिवासी रेल्वे कॉरिडॉर, लखपती दीदी, सायबर आणि मरीन युनिव्हर्सिटीची स्थापना करणे, नवीन मेडिकल कॉलेज आणि तांत्रिक शिक्षण हब आदींवरही आगामी १०० दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more