विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mahavikas Aghadi महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य सामना रंगत असताना या दोन्ही युती आणि आघाडी पासून समान अंतर ठेवल्याचा दावा करीत काही नेत्यांनी तिसरी आघाडी अस्तित्वात आणली आहे. पण आम्ही “तिसरी आघाडी” नव्हे, तर परिवर्तन महाशक्ती आहोत, असा दावा तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या तिसऱ्या आघाडीच्या दाव्यावर महायुतीच्या नेत्यांनी अद्याप काही प्रतिक्रिया दिली नाही, पण संजय राऊत यांनी तोफ डागली आहे. Mahavikas Aghadi is afraid of the third front
संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे पाटील, वामनराव चटप आदी नेत्यांनी तिसरी आघाडी काढली. पण आम्ही “तिसरे” नाही, ते पहिले दुसरे नाहीत, असे सांगून या सगळ्या नेत्यांनी तिसऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती हे नाव घेतले. 26 सप्टेंबरला या महाशक्तीचा छत्रपती संभाजीनगर मध्ये मेळावा देखील जाहीर केला. Mahavikas
Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निरंतर चालू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
या तिसऱ्या आघाडीवरच संजय राऊत यांनी टीकेची तोफ डागली. महाराष्ट्रात फक्त महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत आहे. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल, हे पाहूनच महाविकास आघाडीची मते कापायला ही तिसरी आघाडी काढल्याची टीका संजय राऊत यांनी केली. यातून तिसऱ्या आघाडीची आत्तापासूनच महाविकास आघाडीने धास्ती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. Mahavikas
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more