जाणून घ्या, मायावती यांनी काय दिली प्रतिक्रिया?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi )यांनी शुक्रवारी त्यांच्या पक्षाच्या एससी-एसटी खासदारांची भेट घेतली. यावेळी या खासदारांनी त्यांना निवेदनही दिले. यामध्ये एससी-एसटी आरक्षणासाठी उपश्रेणी निर्माण करण्याची आणि क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्यांच्या मागण्यांवर सरकार विचार करेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी या वृत्ताचे स्वागत केले आहे. हा निर्णय कुचकामी ठरविण्यासाठी सरकारने घटनादुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी सोशल मीडिया साइटवर लिहिले आहे की, एससी-एसटी आरक्षणामध्ये कोणतेही उपवर्गीकरण न करण्याच्या त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, ते योग्य आहे आणि तसे झाल्यास त्याचे स्वागत केले जाईल.
त्यांनी लिहिले, “परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील चर्चेत केंद्र सरकारच्या वतीने ॲटर्नी जनरल यांनी अनुसूचित जाती आणि जमाती आणि त्यांच्या उप-वर्गामध्ये क्रिमी लेयर लागू करण्याच्या बाजूने युक्तिवाद केला नसता तर बरे झाले असते. आरक्षणाबाबत वर्गीकरण ठेवले असते तर कदाचित हा निर्णय आला नसता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more