विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळातला 100 कोटींच्या वसुली प्रकरणाला सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वेगवेगळ्या पत्रांमधून पुरते एक्सपोज केल्यानंतर परमबीर सिंग यांनी आज आणखी एक धक्कादायक खुलासा केला. महाविकास आघाडीच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दबाव होताच, पण अनिल देशमुखांच्या पाठीशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे होते, असा दावाही परमबीर सिंह यांनी केला, तसेच जयंत पाटलांनी सांगलीतल्या विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले होते, असे देखील परमबीर सिंग म्हणाले. Secret explosion of Parambir Singh
महाविकास आघाडीच्य काळात विरोधी नेत्यांना अडकवण्यासाठी दबाव होता. विरोधकांवर गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख होते. पण त्यांच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे होते. गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती, तर मुंबै बँक प्रकरणात प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट परमबीर सिंग यांनी केला.
सांगली जिल्ह्यातलं एक उदाहरण देत परमबीर सिंह यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावरही मोठे आरोप केले. राजकीय विरोधकांवर कारवाईसाठी दबाव आणला जात होता. गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला गेला होता. अनिल गोटे, चव्हाण, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत त्यांनी माझ्यावर दबाव आणला होता, पण मी नकार दिला. 2020 मधील हा प्रकार आहे. जयंत पाटलांनी सांगली जिल्ह्यातल्या विरोधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला होता. पण मी राजकारणासाठी पोलिस विभागाचा वापर होऊ दिला नाही. ठाण्यात माझ्या विरोधात बोगस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्या केसमध्ये फडणवीस आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला, असे परमबीर सिंह म्हणाले.
चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट सबमिट झाला तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यात काय आहे हे त्यांना जास्त माहिती असेल. माझ्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत. गरज भासल्यास योग्य वेळी समोर आणेन. हे प्रकरण अनिल देशमुखांपुरते मर्यादित नव्हते त्याचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत आहे. योग्य वेळी सत्य समोर यईल. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यासाठी अनिल देशमुखांनी सांगितले होते.
अनिल देशमुखांचे आरोप बोगस आहेत. त्यांच्या मानसिक स्थितीची चिंता वाटते. तणावातून ते असे आरोप करत आहेत. सलिल देशमुख यांचा माझ्या संदर्भातील व्हिडीओ बघितला. त्यात असभ्य भाषेचा वापर होता. मी कायम त्यांच्याविषयी आदरानेच बोलतो. मी केलेले 100 कोटींचे आरोप अगदी खरे होते. त्यांचा मुलगा ललित हॉटेलमध्ये बसवून अवैध धंदेवाल्यांसोबत बैठक घ्यायचे हा प्रकार लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे, जयंत पाटील, पवार यांच्या समोर मांडला होता. त्यांना कारवाईत रस नव्हता. त्यांना या प्रकरणाची माहिती होती, असं जाणवलं.
पुरावे ईडी, सीबीआयकडे दिले
उद्धव ठाकरेंना दोन- तीनदा वर्षावर भेटलो. पवारांना सिल्वर ओकवर भेटलो. त्यांनी ऐकून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्याकडे असलेले पुरावे पत्र लिहलं तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहेत. जुलै 2020 मध्ये मी मेरीटनुसार डीसीपींची बदली केली गेली होती. मात्र त्यावर स्टे लावण्यात आला नंतर त्यातील काही अधिकाऱ्यांची पुन्हा पोस्टींग करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून पैसे काढण्यासाठी हा प्रकार केला गेला. माझ्याकडे असलेले पुरावे ईडी, सीबीआयकडे दिले आहेत. ललितमध्ये बसून सलिल देशमुख कुंदन शिंदे आणि एजन्टसह एकत्र डिलींग करत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more