पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्यपदक आहे.
विशेष प्रतिनिधी
नीरज चोप्राने ( Neeraj Chopra )पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक विक्रम करत सुवर्णपदक जिंकले आहे. नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्यपदक पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्यपदक आहे.
दरम्यान, भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, मोदी सरकारने खेळाकडे खूप लक्ष दिले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्याबद्दल गिरीराज सिंह म्हणाले, ‘हे देशाचे भाग्य आहे. आम्ही सुवर्ण जिंकू शकलो असतो. आम्ही कुस्तीतही सुवर्ण जिंकू शकलो असतो पण दुर्दैवाने विनेश फोगटला ते मिळवता आले नाही.
यावेळी काँग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले, ‘मोदी सरकार आल्यापासून क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जागरुकता आली आहे. काँग्रेसने राजकारण केले पण खेळाकडे कधी लक्ष दिले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more