विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठे यश मिळून तेच पुन्हा पंतप्रधान बनतील, असे भारतातल्या विविध माध्यमांच्या सर्वेक्षणात दिसून आलेच आहे, पण आता त्यावर S4 Capital चे बॉस आंतरराष्ट्रीय ऍडव्हर्टायझिंग गुरु मार्टिन सोरेल यांनी देखील शिक्कामोर्तब केले आहे. Modi becoming Prime Minister again is good for India and the world
लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनणे ही भारताच्या आणि जगाच्या आर्थिक विकासासाठी सकारात्मक बाब ठरेल. कारण स्वतःचे आणि भारताचे ब्रँडिंग करण्यात मोदी खूपच आघाडीवर आहेत. इतर नेते त्यांच्या तुलनेत जवळपासही पोहोचू शकत नाहीत, असे मत सोरेल यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका विरुद्ध चीन, रशिया विरुद्ध युक्रेन आणि इजरायल विरुद्ध हमास यांच्यात संघर्ष पेटला असताना या त्रिकोणीय संघर्षात भारत एक आश्वासक अर्थव्यवस्था म्हणून उभी राहात असून आशिया आणि प्रशांत महासागर क्षेत्रात चीनला पर्याय देणारे नेतृत्व म्हणून देखील भारताचे नेतृत्व भक्कम होत आहे, असा विश्वास मार्टिन सोरेल यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर जॉर्ज सोरोस मोदी ब्रँड विरोधात गरळ ओकत असताना मार्टिन सोरेल यांच्यासारख्या जागतिक ऍडव्हर्टायझिंग गुरुने मोदी ब्रँड वर विश्वास दाखवणे आणि त्या पलीकडे जाऊन जागतिक पातळीवर भारताच्या कर्तुत्वाचा ठसा उमटण्यावर शिक्कामोर्तब करणे याला विशेष महत्त्व आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App