यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांना पत्रही पाठवण्यात आले
विशेष प्रतिनिधी
2024च्या स्वातंत्र्यदिनी मंत्री आतिशी ( Minister Atishi ) ध्वजारोहण करतील असे दिल्ली सरकारने ठरवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal )यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी तिहार तुरुंगात पोहोचून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि त्यानंतर GAD विभागाला आदेश जारी केले.
गोपाल राय यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, यावेळी फक्त मंत्री आतिशी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करतील. या संदर्भात एसीएस जीएडी विभागाकडून ध्वजारोहणासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे. मंत्री गोपाल राय यांनी पत्र लिहून याबाबत सूचना दिल्या आहेत.
Sharad Pawar : शरद पवारांना धक्का साताऱ्यात ‘या’ नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
विशेष म्हणजे दरवर्षी दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री छत्रसाल स्टेडियमवर ध्वजारोहण करतात. आम आदमी पक्ष सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे झेंडा फडकवत होते, मात्र सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशा परिस्थितीत आता गोपाल राय आणि सीएम केजरीवाल यांनी मिळून ठरवलं आहे की यावेळी आतिशी ध्वजारोहण करतील.
यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांना पत्रही पाठवण्यात आले असून, यावेळी ध्वजारोहणाची जबाबदारी आतिशी यांच्याकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App