दिल्ली मद्य धोरण प्रकरणी मनीष सिसोदियांना कोर्टाकडून दिलासा नाहीच!

जामीन अर्जावर निर्णय ठेवला राखून


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: दिल्लीच्या अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. ज्यात सिसोदिया यांना आजही दिलासा मिळाला नाही.Manish Sisodia has no relief from the court in the case of Delhi liquor policy



न्यायालयाने सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील निर्णय 30 एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे. याआधी त्यांच्या जामीन याचिकेवर 15 एप्रिल रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली.

तत्पूर्वी सीबीआयने युक्तिवाद केला. मुख्य आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असे सीबीआयच्या वकिलांचे म्हणणे आहे. ईडीनेही सिसोदिया यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. सीबीआयचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. 12 एप्रिल रोजी न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला नोटीस बजावून एका आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले होते.

यासह मनीष सिसोदिया यांनी कोर्टातून अंतरिम जामीन अर्ज मागे घेतला. सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोर्टाकडे अंतरिम जामीन मागितला होता. मनीष सिसोदिया यांच्या नियमित जामीन याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी 30 एप्रिलपर्यंत निकाल राखून ठेवला आहे.

Manish Sisodia has no relief from the court in the case of Delhi liquor policy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात