बारामतीतले कारखाने, विकास यांचे श्रेय एकट्या पवारांनी लाटले, मग आम्ही काय *??; म्हणत अजितदादांनी वाभाडे काढले!!

विशेष प्रतिनिधी

बारामती :  बारामतीतले कारखाने विकास यांचे श्रेय एकट्या पवारांनी लाटले मग आम्ही काय नुसते ** बसलो काय असा खडा सवाल करत अजितदादांनी पुरते वाभाडे काढले!!Ajit pawar targets sharad and rohit pawar for claiming lone credit of baramati sugar factories

बारामती परिसरातले सगळे साखर कारखाने शरद पवारांनी काढले, असा दावा त्यांच्या गटाचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवारांनी काटेवाडीतल्या जाहीर सभेत केला. अजितदादांनी आज तिथेच त्यांचा पुरता समाचार घेतला. बारामतीतले कारखाने नेमके कोणी काढले??, त्याच्यासाठी कष्ट कोणी उपसले??, हे सगळे अजितदादांनी नावांसकट सांगितले. अजितदादांनी आज पवारांच्या घराण्यातली सगळी “रहस्येच” बाहेर काढली.



बारामतीमध्ये शुक्रवारी सुप्रिया सुळेंनी कन्हेरी मारुतीला नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केली, एरवी मंदिरांमध्ये फारसे फिरकत नसलेल्या शरद पवारांनी त्या मारुती मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांच्याही प्रचाराचा नारळ फुटला. प्रचाराच्या पहिल्याच सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा साधला.

 अजित पवार म्हणाले :

ही गावकी – भावकीची किंवा नणंद भावजयची निवडणूक नाही. देशाच्या 135 कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही मोदी साहेब आणि राहुल गांधींची निवडणूक आहे. माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जातात. पण त्यांच्या आरोपामुळे मला काय भोकं पडत नाही. बारामतीची जनता मला अनेक वर्षे ओळखते. माझं लहाणपण येथेच गेलंय.

कालच्या शरद पवारांच्या सभेत अमेरिका टाईम्सचा पत्रकारासह अनेक पत्रकार मंडळी आली होती. यावेळी शरद पवार खुर्चीवर बसले होते, तर सुप्रिया, रोहित आणि युगेंद्र पायापाशी बसले होते. अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते होते. म्हणजे हे अमेरिकेतही पोहोचलं की बघा कुटुंब कसं एक आहे. पण मी त्यांच्याबरोबर होतो, तेव्हा साहेब एकेठिकाणी बसले असतील, तर मी दुसरीकडे बसायचो.

गावच्या प्रचार सभेत सांगितले गेले, बारामतीतले सगळे कारखाने पवार साहेबांनी आणले. पण बारामतीतील सहकारी साखर कारखाने हे शरद पवार यांनी आणलेले नसून ते त्या त्या भागातील जुन्या जाणत्या व्यक्तींना आणले आहेत.

माळेगाव कारखाना शेंबेकरांनी आणला, सोमेश्वर कारखाना मुकुटराव आप्पांनी आणला बारामती नगरपरिषद तर 1865 पासूनची जुनी आहे. विद्या प्रतिष्ठान त्याच्या आधीचे कृषी प्रतिष्ठान यासाठी आप्पासाहेब पवार रामले शरद पवारांचे मार्गदर्शन होते पण बारामतीतल्या सगळ्याच संस्था त्यांनीच आणल्या हे म्हणणे धादांत खोटे आहे.

आम्ही पण आमच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. काहीजण म्हणतात धमक्या दिल्या जातात. पण मी मनापासून व्यासपीठावरून खाली मान घालून बसलो आहे. कोणी काही बोलले तरी मी काय कुणाला बोलतोय का? यापूर्वी म्हणायचे फक्त दुसऱ्या पिढीतील दादा राजकारणात आहे. त्यामुळे घरातील फक्त मी राजकारणात होतो. बाकी सगळेजण धंदापाणी करत होते. मात्र मागील दोन महिन्यापासून आमच्या कुटुंबातील सर्वांनी धंदा पाणी सोडून राजकारणात सक्रिय भाग घेतलाय. गळ्या शप्पथ खरं बोलतोय!!

आपण भावनिक न होता बारामतीचा आपल्या विचारांचा खासदार दिला तर आपल्याला निधी कमी पडणार नाही. पूर्वी विहिरी खांदायला बराच काळ जायचा. मात्र त्यानंतर पोकलेन मशीनने कचाकचा खोदल्या जायला लागल्या.  ममला तर कचाकचा म्हणाल्यावर नोटीसच येते!!

आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी माझ्या पाठीमागे लागून रोहितला जिल्हा परिषद सदस्य करा असे म्हटले होते. त्यावेळी मी शरद पवारांचा विरोध पत्करून त्यांना जिल्हा परिषद सदस्य केले. पुढे ते हडपसर विधानसभा मागू लागले. मात्र मी त्यांना कर्जत जामखेडचे आमदार केले. तेच आता जास्तीचे बोलू लागले आहेत. यासोबत काहींना तर आमदारकीची स्वप्न पडू लागले आहेत.

आता आमच्या नरेंद्र मोदी, अमित शहा  यांच्याशी ओळख व्हायला लागल्या आहेत. पहिले फक्त आम्ही राब राब राबयचो. श्रेय साहेब घेऊन जायचे. आता शेवटच्या सभेत ते भावनिक होतील त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील तुम्ही भावनिक होऊ नका तुम्ही भविष्याचा नीट विचार करून घड्याळाचे बटन दाबा!!

Ajit pawar targets sharad and rohit pawar for claiming lone credit of baramati sugar factories

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात