ममता एकीकडे विचारतात अखिलेशना मदत हवी आहे का? दुसरीकडे अखिलेश यांची आप नेत्यांशी हातमिळवणी!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली /लखनौ : एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूळ काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना मदत हवी असल्यास उत्तर प्रदेशमध्ये येण्याची तयारी दाखवत आहेत, तर दुसरीकडे अखिलेश यादव त्यांना प्रतिसाद देण्याऐवजी आम आदमी पार्टीच्या नेत्यांबरोबर बैठक घेताना दिसले आहेत.Mamata on the one hand asks if Akhileshna needs help. On the other hand, Akhilesh’s handshake with AAP leaders

ममता बॅनर्जी यांनी काल दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत उघडपणे हे स्पष्ट केले, की अखिलेश यादव यांना जर आपली मदत हवी असेल तर आपण उत्तर प्रदेश मध्ये प्रचार करण्यासाठी जायला तयार आहोत. पण त्याच वेळी अखिलेश यादव हे आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंग आणि दिलीप पांडे यांच्याबरोबर बैठक घेत होते.



अखिलेश यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या दोन नेत्यांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. आम आदमी पक्षाशी चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. ती चर्चा सुरू झाली की त्याची माहिती देऊ, असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे.

याचा राजकीय अर्थ सरळ आहे. ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची राजकीय वाटचाल समांतर दिशेने सुरू आहे. हे दोन्ही नेते आपापली राज्ये सोडून अन्य राज्यांमध्ये आपापल्या राजकीय पक्षांचे भवितव्य आजमवताना दिसत आहेत.

सुरुवातीला तरी अखिलेश यादव यांनी आम आदमी पार्टीला प्रतिसाद दिलेला दिसतो आहे. आज ममता बॅनर्जी यांनी जेव्हा अखिलेश यादव यांना गरज असल्यास आपण उत्तर प्रदेशात येऊ असे म्हटले आहेत तेव्हा त्या आवाहनाला अखिलेश कसा प्रतिसाद देतात?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अखिलेश यादव स्वतः उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. परंतु त्यांचे वय लहान असल्याने कदाचित त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या एवढी फुललेली दिसत नाही. परंतु ते तुलनेने छोट्या राज्यांचे नेते असलेल्या ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांचे कशा प्रकारे मदत घेतात किंबहुना मदत घेतात? की त्यांना बाजूला ठेवतात?, यावर देखील उत्तर प्रदेशातली ममता बॅनर्जी केजरीवाल आणि स्वतः अखिलेश यांच्या पुढच्या राजकीय खेळी अवलंबून आहेत.

Mamata on the one hand asks if Akhileshna needs help. On the other hand, Akhilesh’s handshake with AAP leaders

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात