रात्रीस खेळ चाले मालिकेतून अपूर्वाची माघार! मालिका सोडण्याचे काय स्पष्टीकरण दिले अपूर्वाने?


विशेष प्रतिनिधी

मुबंई : रात्रीस खेळ चाले ही छोट्या पडद्यावरील एक गाजलेली मालिका आहे. या मालिकेमधील शेवंताचे कॅरेक्टर प्रचंड फेमस झाले हाेते. शेवंताचे कॅरेक्टर निभावणारी अपूर्वा नेमळेकर हिने ही मालिका सोडली आहे. तर आता शेवंताची भूमिका अपूर्वाच्या जागी कृतिका तुळसकर निभावणार आहे. कृतिकाने बऱ्याच चित्रपटांमध्ये याआधी काम केले आहे. सध्या मालिकेच्या सिजन 3 मध्ये अनेक मालिकेतल्या आवडत्या पात्राची एण्ट्री झालेली दिसत आहे.

Apoorva’s withdrawal from the series of ratris khel chale! What is Apurva’s explanation for leaving the series?

तर रात्रीस खेळ चाले याचा सीझन थ्री लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पाश्र्वभूमीवर अपूर्वाने सीरियल का सोडली? यामागे स्पष्टीकरण देताना तिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरुन याचे स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, सीजन 3 साठी 5 ते 6 दिवसांचे शूटिंग होते. या साठी मी सिझन थ्री करण्यास नकार दिला. पण जेव्हा नकार देण्यात आला त्या वेळी मला आणखी एक शो देण्यात येईल असे प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आले होते. पण मागील बऱ्याच महिन्यात तो शो अजूनही देण्यात आलेला नाहीये. तर या आधी बऱ्याच वेळा चेक देखील देण्यात आलेले नाही.


कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित


पुढे ती म्हणते, रात्रीस खेळ चाले या सीरियल्ससाठी मी 10 किलो वजन वाढवले होते. तर माझ्या वाढलेल्या वजनावरुन मालिकेमधील वरिष्ठ आणि नवोदित कलाकार चेष्टा करायचे. शूटिंगच्या वेळापत्रकाबाबत बोलायचे झाल्यास सावंतवाडीला या मालिकेचे शूटिंग चालू आहे. मुंबईवरून 12 तास लागतात सावंतवाडीला जाण्यासाठी. पण जेव्हा मी जायचे तेव्हा एक दिवसाचं शूटिंग असायचे. बाकी दिवस शूटिंग केले जायचे नाही. त्यानंतर सलग पाच सहा दिवस शूटिंग करावे लागत होते. या सर्व काळामध्ये होणारा प्रवास देखील न झेपणारा होता. त्यामुळे या सर्व कारणांमुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे अपूर्वाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

Apoorva’s withdrawal from the series of ratris khel chale! What is Apurva’s explanation for leaving the series?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात