विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रामध्ये love jihad विरोधातला कायदा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने नुसती समिती स्थापन केली, तर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी त्यावर लगेच आगपाखड केली.
महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार आले, तर love jihad विरोधात कायदा करू, असे आश्वासन भाजपने आणि शिवसेनेने आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये दिलेच होते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस सरकारने राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विविध खात्यांमधल्या सचिवांची एक समिती गठित केली. यासंदर्भात कालच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने आदेश काढले. मात्र त्यावरून काँग्रेस आणि समाजवादी नेते पार्टीचे नेते चिडले आणि त्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महाराष्ट्रात love jihad विरोधातला कायदा अस्तित्वात आला, तर तो अमलात आणणारे महाराष्ट्र हे दहावे राज्य ठरेल. यापूर्वी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी love jihad विरोधातले कायदे अंमलात आणले. त्या पाठोपाठ आता महाराष्ट्र नंबर लावणार आहे.
पण समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी महाराष्ट्रात love jihad कायदा करायला विरोध केला. महाराष्ट्रात सरकारला केवळ हिंदू – मुस्लिम दुही माजवायची आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला स्वतःचा धर्म अनुसरण्याची मुभा दिली असताना राज्यघटना विरोधी कायदा करून सरकार मुस्लिम समाजाला दुय्यम वागणूक देत आहे, असा आरोप अबू आजमी आणि हुसेन दलवाई यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केला. महाराष्ट्रातल्या सगळ्या love jihad केसेस खोटे असल्याचा दावाही या दोन्ही नेत्यांनी केला. कुठल्याही व्यक्तीला जबरदस्तीने कोणीही धर्मांतर करायला लावत नाही. अशा पद्धतीने धर्मांतर होत नाही, असा दावा हुसेन दलवाई यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App