जाणून घ्या, नेमका कशाबद्दल घडला आहे विक्रम?
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज :Mahakumbh महाकुंभमेळ्याचा आज ३४ वा दिवस आहे. यावेळी महाकुंभात अनेक नवीन विक्रम झाले आहेत. महाकुंभमेळ्यादरम्यान आतापर्यंत ५० कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. यानंतर महाकुंभात आणखी एक विक्रम झाला आहे. जगभरातून लाखो भाविक महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महाकुंभात ६० कोटींहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.Mahakumbh
विविध राज्य सरकारे प्रयागराजला येणाऱ्या भाविकांसाठी विशेष बसेस चालवत असताना, रेल्वेने विविध राज्यांमधून येणाऱ्या महाकुंभासाठी विशेष गाड्यांची व्यवस्थाही केली आहे. पण यासोबतच, कोट्यवधी लोक त्यांच्या खासगी वाहनांमधून महाकुंभात पोहोचत आहेत. एवढेच नाही तर महाकुंभमेळ्यादरम्यान संगमात स्नान करण्यासाठी काहीजण त्यांच्या चार्टर्ड विमानांनी प्रयागराज विमानतळावर पोहोचले आहेत.
महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराज विमानतळावर दररोज अनेक चार्टर्ड आणि खासगी जेट विमाने उतरत आहेत. त्यामुळे प्रयागराज विमानतळावरही विमानांची रांग लागली आहे. महाकुंभामुळे, प्रयागराजमध्ये वाहनांच्या पार्किंगव्यतिरिक्त, खासगी जेट आणि चार्टर्ड विमाने देखील विमानतळावर पार्किंगसाठी उभी आहेत.
महाकुंभमेळ्यादरम्यान, आतापर्यंत ६५० हून अधिक चार्टर्ड विमाने प्रयागराज विमानतळावर उतरली आहेत. या कालावधीत, ११ फेब्रुवारी रोजी प्रयागराज विमानतळावर सर्वाधिक ७१ चार्टर्ड विमाने उतरली. जो आतापर्यंतचा एक विक्रम आहे. यापूर्वी, ८ फेब्रुवारीपासून, ६० हून अधिक चार्टर्ड आणि खासगी विमाने प्रयागराज विमानतळावर उतरतली होती. यानंतर, हा आकडा 650 च्या वर गेला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App