Manoj Sinha : जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली मोठी कारवाई

Manoj Sinha

तीन सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : Manoj Sinha  जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे दहशतवाद आणि खोऱ्यातील दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून त्यांनी तीन सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.Manoj Sinha

बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक हवालदारही असल्याचे सांगण्यात येत आहे. अशी माहिती समोर येत आहे की तो विभागात असताना दहशतवाद्यांना इनपुट पाठवत होता. ज्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यात एक शिक्षक आणि दुसरा अन्य विभागात काम करणारा अर्दली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख फिरदौस भट, निसार अहमद खान आणि अशरफ भट अशी झाली आहे.



सुरक्षा आढावा बैठकीनंतर एका दिवसात तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतला आहे. त्या बैठकीत उपराज्यपालांसह पोलिस आणि सुरक्षा संस्थांचे उच्च अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत मनोज सिन्हा यांनी दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते.

मनोज सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. असा गुन्हा जो कोणी करेल त्याला सोडले जाणार नाही. अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल.

Jammu and Kashmir Lieutenant Governor Manoj Sinha took major action

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात