‘भारतरत्न’ जाहीर झाल्यावर लालकृष्ण अडवाणींची अशी होती पहिली प्रतिक्रिया

पाहा, अडवाणींचा विशेष व्हिडीओ

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली. खुद्द पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली. LK Adwanis first reaction after the Bharat Ratna was announced

तर लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याची बातमी समजताच ते भावूक झाले. लालकृष्ण अडवाणी यांची पहिली झलक समोर आली आहे, ज्यामध्ये ते जनतेला आणि मीडियाला हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत.

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्याची घोषणा झाल्यानंतर प्रतिभा अडवाणी म्हणाल्या की, संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. आज मी माझ्या आईला सर्वात जास्त मिस करत आहे. आजोबांच्या आयुष्यात आईचे योगदान मोठे आहे. दादा (अडवाणी) खूप खुश आहेत. मी पंतप्रधान मोदींचे आभार मानते. खरे तर ज्या वर्षी राम मंदिराचे उद्घाटन झाले त्याच वर्षी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात येत आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 मध्ये राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी ‘राम रथयात्रा’ काढली होती.

LK Adwanis first reaction after the Bharat Ratna was announced

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात