राम मंदिराच्या स्वप्नपूर्तीनंतर अयोध्या रथयात्रेचे प्रणेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन!!

LK Advani declared Bharat Ratna

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सन 2024 एकापाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या घेऊन येत आहे 22 जानेवारीला राम मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राम जन्मभूमी आंदोलनाचे अध्वर्यू माजी उपपंतप्रधान आणि माझी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींना केंद्रातील मोदी सरकारने भारतरत्न किताब जाहीर केला आहे. LK Advani declared Bharat Ratna

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. भारतरत्न जाहीर होताच स्वतः मोदींनी लालकृष्ण अडवाणींना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. लालकृष्ण अडवाणींच्या अद्भुत आणि अभूतपूर्व देश सेवेसाठी त्यांना भारतरत्न किताब जाहीर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. भारताचे उपपंतप्रधानपद, गृहमंत्री पद आणि माहिती प्रसारण मंत्री पद भूषवत लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय संसदीय परंपरेत अतिशय मोलाचे योगदान केले. त्यांच्या या योगदानाबद्दल भारतरत्न हा किताब त्यांना प्रदान करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

सन 2024 हे वर्ष एकापाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या घेऊन येत आहे. 22 जानेवारीला राम जन्मभूमी मंदिरात बालक राम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राम जन्मभूमी आंदोलनाचे अध्वर्यू लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यामुळे या आनंदात मोठी भर पडली आहे.

अयोध्या रथयात्रेचे प्रणेते

लालकृष्ण अडवाणी यांच्याच नेतृत्वाखालच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेमुळे अयोध्येतील राम जन्मभूमी आंदोलनाला गती मिळाली त्याचे रूपांतर नंतर भाजपच्या राजकीय यशात झाले. भाजप देशाच्या राजकीय व्यवस्थेला मुख्य प्रवाहातला प्रमुख पक्ष बनला. भाजपचा सत्तेचा मार्ग लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखालीच अधिकाधिक विस्तारत गेला.

वाजपेयी सरकारचे चाणक्य

भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा सरकार चालवले, पण त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा सिंहाचा वाटा राहिला. मोदी सरकारने 2016 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न किताब प्रदान केला. त्यानंतर 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिराची स्वप्नपूर्ती झाल्यानंतर राम जन्मभूमी आंदोलनाचे अध्वर्य लालकृष्ण अडवाणी यांना देखील भारतरत्न किताब जाहीर केला. यामुळे रामजन्मभूमी आंदोलनाची आनंददायी परिपूर्ती झाली आहे.

LK Advani declared Bharat Ratna

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात