Liquor Policy Scam : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना ‘ED’ केली अटक!


मद्य धोरण घोटाळ्यात प्रदीर्घ चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाची मोठी कारवाई!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनाल अटक केली आहे. Liquor Policy Scam Aam Aadmi Party MP Sanjay Singh arrested by ED

मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आज ईडीने आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापा टाकला होता.  ईडी मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये संजय सिंह यांचेही नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने संजय सिंह यांची जवळपास दहा तास चौकशी केली होती. सध्या संजय सिंह त्यांच्या घरी हजर आहेत. चौकशीनंतर ईडीने संजय सिंह यांना अटक केली आहे. यानंतर निमलष्करी दलाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता ईडीचे अधिकारी संजय सिंह यांना ताब्यात घेणार आहेत. त्याचवेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही संजय सिंह यांच्या घराबाहेर जमायला लागले आहेत.

आप खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा; दिल्लीतील घराची झडती, अबकारी धोरण केसच्या आरोपपत्रात नाव

यापूर्वी 24 मे रोजी याच प्रकरणात ईडीने संजय सिंह यांच्या जवळच्या नातेवाईकांवर छापे टाकले होते. तेव्हा ते म्हणाले होते की” मी ईडीचा खोटा तपास संपूर्ण देशासमोर उघड केला. याबाबत ईडीने चूक मान्य केली. माझ्याकडे काहीही सापडले नाही, तेव्हा आज ईडीने माझे सहकारी अजित त्यागी आणि सर्वेश मिश्रा यांच्या घरांवर छापे टाकले. सर्वेश यांचे वडील कर्करोगाने त्रस्त आहेत. हा गुन्ह्याचा कळस आहे. कितीही गुन्हा केला तरी लढा सुरूच राहणार आहे.”

Liquor Policy Scam Aam Aadmi Party MP Sanjay Singh arrested by ED

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात