महिलांच्या आंदोलनाचे यश म्हणून दारूबंदीचे मॉडेल ठरलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली आहे. हजारो कुटुंबांच्या राखरांगोळीच्या निर्णयाचा शब्द पालक मंत्री विजय वडेट्टीवारांनी पाळला, असा आरोप महिला करत आहेत liquor banned Back in Chandrapur district vijay wadattiwar
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : महिलांच्या आंदोलनाचे यश म्हणून दारूबंदीचे मॉडेल ठरलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली आहे. हजारो कुटुंबांच्या राखरांगोळीच्या निर्णयाचा शब्द पालक मंत्री विजय वडेट्टीवारांनी पाळला, असा आरोप महिला करत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी अनेक आंदोलने झाली होती. त्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली.
डॉ. विकास आमटे, प्रा. मनोहर सप्रे, प्राचार्य मदन धनकर, प्राचार्य जे. ए. शेख, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांचा समावेश होता. श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात १ लाख ६ हजार सह्यांचे निवेदन आणि ५४५ ग्रामसभेचे ठराव देवतळे समितीला सादर झाले.
फेब्रुवारी २०१२ मध्ये देवतळे यांनी अहवाल मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. दारुबंदी आंदोलनाचे लोण जिल्हाभर पसरले. वाढती मागणी विचारात घेता
तत्कालीन अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर दारूबंदीची ग्वाही दिली होती. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी दारूबंदी घोषित झाली.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या नेतृत्वात दारूबंदी अभ्यास समिती गठित केली. या समितीकडे २ लाख ८२ हजार नागरिकांच्या सूचना आल्या.
समितीने मार्च २०२० मध्ये हा अहवाल पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याकडे सादर केला. अहवाल मंत्रिमंडळात पोहोचल्यानंतर दारूबंदी उठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
त्यानंतर आॅक्टोबर २०२० मध्ये दारूबंदीचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक १३ सदस्यीय समिती गठित झाली. या समितीकडे २,६९,८२४ निवेदने आली.
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मनुगंटीवार यांनी या निर्णयाला विरोध करताना म्हटले आहे की, सरकारने दारूला समर्थन देणाºया आपल्या भूमिकेला साजेसा निर्णय घेतला आहे. अवैध दारू विक्री होते हे सांगून आघाडी सरकारने आपले अपयश मान्य केले आहे.
भाजप सरकारने जनतेच्या आवाजाला प्रतिसाद देत दारूबंदी केली होती. हजारो महिलांच्या मागणीला प्रतिसाद दिला होता. परंतु, दारू माफियांच्या दबावापुढे झुकून आघाडी सरकारने बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App