मीडिया ट्रायलविरुद्ध कुस्तीपटू सुशील कुमार याच्या आईने न्यायालयात विनंती याचिका केली आहे. सुशीलबाबत मीडियामध्ये प्रकाशित होणारी वृत्ते निराधार असल्याचा दावा सुशीलच्या कुटुंबीयांनी केला आहे. या वृत्तांमुळे आमची बदनामी होत असल्याचे सांगून मीडियातील वृत्तांवर बंदी आणण्याची विनंती करणारी याचिका सुशीलच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली.Stop Sushil Kumar’s media trial , mother’s petition in court
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :मीडिया ट्रायलविरुद्ध कुस्तीपटू सुशील कुमार याच्या आईने न्यायालयात विनंती याचिका केली आहे. सुशीलबाबत मीडियामध्ये प्रकाशित होणारी वृत्ते निराधार असल्याचा दावा सुशीलच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या वृत्तांमुळे आमची बदनामी होत असल्याचे सांगून मीडियातील वृत्तांवर बंदी आणण्याची विनंती करणारी याचिका सुशीलच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली.
२३ मे रोजी सुशीलला सहकाऱ्या सह अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची सात दिवसांची कोठडी घेतली. सुशील कुमारचे वकील जाखड म्हणाले, इस्पितळात पीडिताची साक्ष नोंदविली जाते.
त्यावेळीदेखील सागरच्या किंवा अन्य जखमींच्या तोंडून सुशीलचे नाव निघाले नव्हते. पोलिसांनी नंतर सुशीलचे नाव अपहरण, मारहाण आणि हत्या प्रकरणात जोडले.
केवळ दहा दिवसांत अजामीनपात्र वॉरंट काढून सुशीलवर एक लाखाचे बक्षीस घोषित केल्यावरूनदेखील जाखड यांनी आक्षेप घेतला. आतापर्यंत कुख्यात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच अजामीनपात्र वॉरंट काढणाऱ्या दिल्ली पोलिसांनी इतकी घाई का केली?
सुशील हा नामवंत मल्ल आहे. दोनवेळेचा ¸ऑलिम्पिक पदक विजेता आहे, असा जाखड यांनी बचाव केला. हत्येचा गुन्हा कबूलकरण्यासाठी दबाव आणला जात आहे. कोऱ्या कागदावर त्याची सही घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जाखड यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App