तू पाकिस्तानव्याप्त आझाद काश्मीरला मुक्त करण्याची भाषा करत आहेस. जम्मूमध्ये मंदिरे बांधत आहेस. पाकिस्तानविरुध्द विषाारीप्रचार करत आहेस. तुझी जिभ कापून जम्मू शहरात फाशी देऊ, अशी धमकी पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाकडून भारतीय जनता पक्षाचे जम्मू आणि काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांना येत आहेत.Lashkar-e-Toiba threatens to hang BJP president in Jammu and Kashmir
विशेष प्रतिनिधी
जम्मू : तू पाकिस्तानव्याप्त आझाद काश्मीरला मुक्त करण्याची भाषा करत आहेस. जम्मूमध्ये मंदिरे बांधत आहेस. पाकिस्तानविरुध्द विषाारीप्रचार करत आहेस. तुझी जिभ कापून जम्मू शहरात फाशी देऊ, अशी धमकी पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाकडून भारतीय जनता पक्षाचे जम्मू आणि काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांना येत आहेत.
जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांच्याकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. य प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.मात्र, याबाबत पोलीसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
रैना म्हणाले, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानातील मोबाईल नंबरहून त्यांना धमक्या आल्या. लष्कर ए तोयबाचा तथाकथित कमांडंट असलेल्याने आपल्याला जम्मू आणि काश्मीर सोडून जाण्यास सांगितले. त्याने व्हॉटसअॅपवर एक धमकीचा व्हिीओही पाठविला आहे. सुमारे साडेतीन मिनीटांच्या व्हिडीओमध्ये बुरखा घातलेला एक जण दिसत आहे. त्याच्या हाता एके असॉल्ट रायफल असून पिस्तुल आणि चार हातबॉँबही दिसत आहे.
तू पाकिस्तानव्याप्त आझाद काश्मीरला मुक्त करण्याची भाषा करत आहेस. जम्मूमध्ये मंदिरे बांधत आहेस. पाकिस्तानविरुध्द विषाारीप्रचार करत आहेस. तुझी जिभ कापून जम्मू शहरात फाशी देऊ. तुला ही शेवटची संधी आहे. याप्रकारची वक्तव्ये करणे सोड अन्यथा तुझा मृत्यू निश्चित आहे, अशी धमकीही त्याने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App