सचिन तेंडुलकरच कोरोनामुक्त झालेल्यांना आवाहन ; प्लाझ्मा डोनेट करा!


  • वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या शुभेच्छांमुळे माझा आजचा दिवस खास बनला. मागील एक महिना माझ्यासाठी खूप कठीण होता. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी 21 दिवस वेगळा होतो. ‘तुमच्या प्रार्थना व शुभेच्छा, माझ्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या शुभेच्छा, सर्व डॉक्टर आणि त्यांचे सहकारी यांनी मला सकारात्मक ठेवले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: सचिन तेंडुलकरचा आज 48 वा वाढदिवस …दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सचिनवर झाला …सचिनने त्यांच्या खास शैलीत आपल्या चाहत्यांना धन्यवाद देत एक विशेष आवाहन देखील केलं आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत सचिनने कोरोनामधून सावरलेल्या लोकांनी प्लाझ्मा डोनेट करावा असं आवाहन केलं आहे.Sachin tendulkar appeals to those recovered from covid for plasma donation

आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने जगभरात अनेकांना आपलसं केलं. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात सचिन तेंडुलकरचे अनेक फॅन्स आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या सचिनने आजच्या दिवशी आपल्याला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

यावेळी बोलत असताना सचिनने हॉस्पिटलमध्ये असताना आपली काळजी घेणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानले. ज्या लोकांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांनी आता प्लाझ्मा डोनेट करावा. यासाठी आपण आपल्या डॉक्टरशी चर्चा करुन त्यांचा सल्ला घेऊन प्लाझ्मा डोनेट करा असं आवाहन सचिनने आपल्या फॅन्सना केलं आहे. प्लाझ्मा डोनेशनबद्दल मी देखील माझ्या डॉक्टरांशी चर्चा केली असून मी देखील लवकरच प्लाझ्मा डोनेट करणार असल्याचं सचिनने सांगितलं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे करणाऱ्या सचिनचा 48 वर्षांचा झाला आहे. आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने वन-डे, टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. फक्त क्रिकेट नाही तर मैदानाबाहेरही सचिन नेहमी गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढे येत असतो.

Sachin tendulkar appeals to those recovered from covid for plasma donation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात