विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातल्या मध्यमवर्गीय मतदारांनी सगळे फायदे काँग्रेस कडून उपटले, पण आज ते भाजपला पाठिंबा देत आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी देशातल्या मध्यमवर्गीयांवर आगपाखड केली. ही आगपाखड त्यांनी एवढ्याच शब्दांमध्ये मर्यादित ठेवली नाही, तर त्यापुढे जाऊन पंडित नेहरूंनी स्थापन केलेल्या आयआयटीमध्ये शिकून परदेशात जाऊन श्रीमंत झालेले आज नेहरू विरोधी झालेत, अशी मुक्ताफळे देखील कुमार केतकर यांनी उधळली.
काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल आणि इकॉनॉमिक चेंज या संस्थेने दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्या सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भालचंद्र मुणगेकर आदींची भाषणे झाली. कुमार केतकर यांनी या सभेत देशातल्या मध्यमवर्गीय मतदारांना टार्गेट केले.
– कुमार केतकर म्हणाले :
– ज्या मध्यमवर्गीयांना 1990 पूर्वी सायकल घेण्याची मारामार होती, ते आज दोन – दोन मोटारी बाळगत आहेत. चाळीत राहणारे मध्यमवर्गीय आज आलिशान घरात राहात आहेत.
– 1991 मध्ये आपले कुटुंब कसे होते आणि आज आपले कुटुंब कुठल्या पातळीवर येऊन पोहोचले याचा मध्यमवर्गीयांनी विचार करावा.
– पंडित नेहरूंनी स्थापन केलेल्या आयआयटीमधून शिकून अमेरिकेत गेलेली मध्यमवर्गीयांची मुले आज नेहरू विरोधी झाली आहेत.
– सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी काँग्रेस – नेहरू – इंदिरा गांधी यांच्याकडून फायदे घेतले, पण तेच मध्यमवर्गीय आज भाजपला पाठिंबा देत आहेत.
मनमोहन सिंग यांच्या श्रद्धांजली सभेत कुमार केतकर यांनी मध्यमवर्गीय मतदारांवर अशाप्रकारे आगपाखड केल्याने तो सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चेचा विषय बनला. अनेकांनी कुमार केतकर यांना मध्यमवर्गीय म्हणजे काँग्रेसचे गुलाम मतदार नव्हते आणि नाहीत याची आठवण करून दिली.
नेहरू आणि इंदिरा गांधींनी मध्यमवर्गीयांसाठी काही केले म्हणून राहुल गांधींसाठी मते देण्याची मध्यमवर्गीयांवर कोणी सक्ती करू शकत नाही, असे अनेकांनी कुमार केतकर यांना सुनावले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App