Who Is Priti Patel : भारतातील पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून पळून गेलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदीला (Nirav Modi) भारतात प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची दोन अब्ज डॉलरची फसवणूक केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Jhonson) आता भारत भेटीवर येणार आहेत. त्यांच्या या भेटीच्या ठीक आधी ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल (Priti Patel) यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणावर स्वाक्षरी केली. भारतवंशीय प्रीती पटेल ब्रिटनचे पॉवरफुल असलेले गृहमंत्रालय सांभाळतात, यामुळे प्रीती पटेल यांच्याबद्दल (Who is Priti Patel) जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. Know Who is Priti Patel, The British Home Minister approves Nirav Modi Extradition
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातील पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून पळून गेलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदीला (Nirav Modi) भारतात प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची दोन अब्ज डॉलरची फसवणूक केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Jhonson) आता भारत भेटीवर येणार आहेत. त्यांच्या या भेटीच्या ठीक आधी ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल (Priti Patel) यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणावर स्वाक्षरी केली. भारतवंशीय प्रीती पटेल ब्रिटनचे पॉवरफुल असलेले गृहमंत्रालय सांभाळतात, यामुळे प्रीती पटेल यांच्याबद्दल (Who is Priti Patel) जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
ब्रिटनच्या पहिल्या ब्रिटिश भारतीय कॅबिनेट मंत्री आणि पहिल्या गुजराती महिला खासदार प्रीती पटेल यांनी ब्रिटिश राजकारणात यशाचे शिखर गाठण्याआधी अनेक संघर्षाचा सामना केला. 2016 मध्ये त्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट सेक्रेटरी पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला भारतीय कॅबिनेट मंत्री बनल्या. जुलै 2019 मध्ये 48 वर्षीय प्रीती पटेल यांची बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी निवड केली. ब्रिटिश सरकारमधील सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या सर्वात ज्येष्ठ भारतवंशीय खासदार आहेत.
ब्रिटनमध्ये गृहमंत्र्यांचे पद तिसरे सर्वात महत्त्वाचे पद आहे. या पदाच्या वर फक्त पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांचे पद असते. प्रीती यांना ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षा, गुन्हे, दहशतवाद आणि इमिग्रेशन यासारख्या विषयांना हाताळावे लागते. त्यांनीच नीरव मोदीच्या प्रत्यार्पणावरही निर्णय घेतला. पटेल एक कष्टकरी कुटुंबातल्या आहेत. त्यांचे कुटुंब 20व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरातेतून युगांडामध्ये गेले होते.
युगांडामध्ये लष्करी हुकूमशहा इदी अमीनने तेथील भारतीयांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला. यानंतर पटेल यांचे वडील सुशील आणि आई अंजना पटेल हे युगांडा सोडून 1970 मध्ये ब्रिटनमध्ये आले. पटेल यांच्या आईवडिलांनी हर्टफोर्डशायरमध्ये वास्तव्य केले. येथेचे प्रीती यांनी आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. त्यांनी वेटफॉर्ड ग्रामर स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. यानंतर त्या कील युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊ लागल्या. येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युनिवर्सिटी ऑफ एसेक्समधून पदव्युत्तर पदवी घेतली.
प्रीती पटेल यांनी मार्केटिंग सल्लागार एलेक्स सॉयर यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना एक मुलगाही आहे. त्यांच्या मुलाचे नाव फ्रेडी आहे. तथापि, 2010 मध्ये खासदार बनल्यानंतर तसेच ब्रिटिश राजकारणात सक्रिय राहताना अनेक वेळा पटेल यांना टीकेचे धनी व्हावे लागले आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये एका खासगी वैयक्तिक सुटीदरम्यान इस्रायली मंत्र्यांसोबत अनौपचारिक बैठकांमुळे त्यांना ‘इंटरनॅशनल डेव्हलपमेंट सेक्रेटरी’चे पद गमवावे लागले. दुसरीकडे, प्रीती पटेल माजी पीएम मार्गारेट थॅचर यांना आपला आदर्श मानतात. प्रीती पटेल ब्रेक्झिटच्या कट्टर समर्थक राहिलेल्या आहेत. त्यांनी नुकतेच विन्स्टन चर्चिल यांना स्वातंत्र्याचे सर्वात महान संरक्षक म्हणून संबोधले होते.
Know Who is Priti Patel, The British Home Minister approves Nirav Modi Extradition
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App