विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – राजधानीतील दलित मुलीवरील अत्याचार आणि खूनप्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे निर्देश देत मुलीच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर केली. Kejariwal orders judicial probe
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. न्यायासाठीच्या या लढाईमध्ये आपण सदैव त्यांच्यासोबत राहू असे सांगतानाच त्यांनी या लढ्यातून एक इंचदेखील माघार घेणार नाही असे स्पष्ट केले. या पीडितेचे कुटुंबीय केवळ न्याय मागत असून त्यांना सर्वोतपरी मदत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी ईशान्य दिल्लीतील जुन्या नानगल भागामध्ये आंदोलन सुरू केले असून त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून राज्य सरकार विद्वान वकिलांची नेमणूक करेल असे आश्वाकसन केजरीवालांनी यावेळी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App