उच्चपदस्थांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडीओ बनविण्याची टोळी मध्य प्रदेशात २०१९ मध्ये पकडली होती. हे व्हिडीओ आपल्याकडे एका पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. अश्लिल व्हिडीओ स्वत:कडे ठेवल्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. कमलनाथांचा देठ हिरवा अशी टीका केली जात आहे. तर मुख्यमंत्रीपदाच्या गोपनियतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाने केली आहे. Kamal Nath kept to himself the much talked about Honey Trap pornographic video, which was investigated during his tenure as Chief Minister.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : उच्चपदस्थांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडीओ बनविण्याची टोळी मध्य प्रदेशात २०१९ मध्ये पकडली होती. हे व्हिडीओ आपल्याकडे एका पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. अश्लिल व्हिडीओ स्वत:कडे ठेवल्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. कमलनाथांचा देठ हिरवा अशी टीका केली जात आहे. तर मुख्यमंत्रीपदाच्या गोपनियतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाने केली आहे.
सप्टेंबर २०१९ मध्ये भोपाळ आणि इंदूरमधून हनी ट्रॅपचा प्रकार उघडकीस आला होता. एका टोळीकडून पाच महिलांचा वापर करून उच्चपदस्थांना जाळ्यात अडकवले जात होते. या महिला त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत. या टोळीकडून त्याचे व्हिडीओ बनविले जात. त्याचा वापर करून उच्चपदस्थांना ब्लॅकमेल केले जात होते. पोलीसांनी या टोळीला अटक केली होती. मात्र, आता कमलनाथ यांनी दावा केला आहे की या हनी ट्रॅप प्रकरणातील व्हिडीओंचा पेन ड्राईव्ह आपल्याकडे आहे.
मध्यप्रदेश भाजपा अध्यक्ष विष्णुदत्त शर्मा म्हणाले कमलनाथ यांनी या व्हिडीओंचा गैरवापर केला आहे का याचा शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर अधिकाºयांनीही हा पेन ड्राईव्ह कमलनाथ यांच्यापर्यंत कसा पोहोचला याचे उत्तर द्यायला हवे. मुख्यमंत्रीपदाच्या गोपनियतेच्या शपथीचा कमलनाथ यांनी भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही पुराव्यात छेडछाड आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करायला हवी.
आपल्याकडे हनी ट्रॅपचा पेन ड्राईव्ह असल्याचे सांगून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉँग्रेसचे माजी मंत्री आमदार उमंग सिंघार यांच्या बंगल्यात एका महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणातून त्यांना सोडविण्याचा कमलनाथ यांचा प्रयत्न आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App