ज्योतिरादित्यांना घालवले, पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ला, आता कमलनाथांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत

मध्य प्रदेशातील आपल्या कारभाराने ज्योतिरादित्य शिंदे यांना कॉंग्रेसमधून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यानंतर पोटनिवडणुकांत सपाटून मार खाल्ला. आता कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशातील आपल्या कारभाराने ज्योतिरादित्य शिंदे यांना कॉंग्रेसमधून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यानंतर मुख्य निवडणूक आणि पोटनिवडणुकांत सपाटून मार खाल्ला. या सगळ्याचे आता कर्तेधर्ते कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. jyotiraditya scindia KamalNath by-elections madhyapradesh news

मला आता कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही, सर्व काही मिळवून झालं आहे. त्यामुळे आता घरी बसून आराम करण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य कमलनाथ यांनी छिंदवाड्यात एका सभेत बोलताना केले. कमलनाथ यांना तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारवही कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली.jyotiraditya scindia KamalNath by-elections madhyapradesh news

इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून पक्षात सक्रिय असलेले कमलनाथ हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ समजले जातात. केंद्रात दीर्घकाळ त्यांनी मंत्रिपद सांभाळलं होतं. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार स्थापन करण्यात त्यांना यश मिळालं आणि मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. मात्र ते सरकार काठावर असलेल्या बहुमताचं असल्याने भाजपने धक्का देत सरकार खाली खेचलं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली होती त्यामुळे कमलनाथ यांच्या विरुद्ध नाराजीही व्यक्त केली जात होती. पक्षांतर्गत मतभेदांना कंटाळून तरुण नेते जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*