विरोध पक्षांनी केला पक्षपातीपणाचा आरोप
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Waqf Bill वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चा अहवाल गुरुवारी राज्यसभेत सादर करण्यात आला, त्यानंतर विरोधी पक्षांनी निषेध केला आणि गोंधळ घातला. काँग्रेसने अहवालाला एकतर्फी म्हटले आणि सांगितले की आमच्या अहसमतीस अहवालात स्थान देण्यात आलेले नाही.Waqf Bill
तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जेपीसी अहवाल बनावट असल्याचे म्हटले आणि हा अहवाल स्वीकारणार नसल्याचे सांगितले. त्यांनी या अहवालाला असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी म्हटले. खासदारांचे मत दाबले जात आहे आणि स्टेकहोल्डर्सना बाहेरून बोलावून त्यांचा स्टेक घेतला जात आहे. हा अहवाल जेपीसीकडे परत पाठवावा अशी मागणी खर्गे यांनी केली.
तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनीही आरोप केला की आमच्या असहमतीच्या टिप्पण्यांचा या जेपीसी अहवालात समावेश नाही. त्याच वेळी, किरण रिजिजू यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि ते चुकीचे असल्याचे म्हटले. रिजिजू म्हणाले की, अहवालात विरोधकांची असहमतीही नोंदवली गेलेली आहे..
यापूर्वी, जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी आयएएनएसशी बोलताना म्हटले होते की, आमचे काही सदस्य म्हणत आहेत की आम्ही असहमत आहोत, आमचे विचार ऐकले गेले नाहीत. पण आम्ही सहा महिने सतत त्यांचे ऐकत राहिलो. त्यांनी सुचवलेल्या सुधारणांवर आम्ही मतदान केले, ही संसदेची प्रक्रिया आहे. कोणत्याही कायद्यावर आणि कोणत्याही अहवालावर सहमती किंवा मतभेद असू शकतात. आम्ही सर्व मुद्दे मतदानासाठी ठेवले, जे बहुमतात होते ते स्वीकारले आणि जे अल्पमतात होते ते नाकारले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App