यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी महाकुंभात इस्कॉन मंदिराच्या मंडपात आग लागली होती.
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : Mahakumbh Mela महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा आग लागण्याची घटना घडली आहे. महाकुंभ मेळ्यातील नागवासुकी परिसराजवळ ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत दोन तंबू रिकामे करण्यात आले होते.Mahakumbh Mela
नागावसुकी परिसरात बिंदू माधव मार्गावर एक पोलिस छावणी आहे. येथे एक तंबू उभारण्यात आला आहे, ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी राहतात. गुरुवारी दुपारी अचानक या तंबूला आग लागली. यामुळे घबराट निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत दोन तंबू जळाले होते. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे दिसून येते. मात्र, खरे कारण तपासानंतरच कळणार आहे.
यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी महाकुंभात इस्कॉन मंदिराच्या मंडपात आग लागली होती. मात्र, माहिती मिळताच अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचला आणि आरएएफ व पोलिसही सतर्क राहिले. परिणामी काही वेळातच आग आटोक्यात आली. सेक्टर १८ मधील शंकराचार्य मार्गावरील हरिहरानंद कॅम्पमध्ये ही घटना घडली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App