अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amanatullah Khan नवी दिल्लीतील ओखला विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नवीन एफआयआर प्रकरणात त्यांनी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.Amanatullah Khan
या जामीन अर्जावर आज न्यायालय सुनावणी करू शकते. अमानतुल्ला खान यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत असा दावा करत, चौकशीत सामील होण्यापूर्वी सुरक्षेची मागणी केली आहे.
बुधवारी अमानतुल्ला खान यांनी दिल्ली पोलिसांना ई-मेलसोबत जोडलेले पत्र पाठवले होते, ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की ते फरार झाले नाहीत आणि त्यांच्या मतदारसंघात आहेत. पत्रात त्यांनी म्हटले आहे की त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. तथापि, पोलिसांनी अशा कोणत्याही मेल किंवा पत्राची माहिती असल्याचे नाकारले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App