कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराचा खर्च सरकार करणार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची माहिती

झारखंडमध्ये कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही माहिती दिली.Jharkhand Chief Minister Hemant Soren informed that the government will pay for the funeral of corona death


विशेष प्रतिनिधी

रांची : झारखंडमध्ये कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही माहिती दिली.

रामगढ जिल्ह्यातील एका कोरोना सेंटरचे व्हर्च्यूअल उद्घाटन करताना सोरेन बोलत होते. ते म्हणाले, त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्काराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येईल.



दहनासाठी आवश्यक असलेली लाकडेही स्मशानभूमीत मोफत पुरविण्यात येतील. त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या दफनभूमीमध्ये कबर खोदण्यासाठी लागणारा खर्चही सरकार करणार आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाणार आहे.

झारखंडमध्ये कोरोनाच्या दुसºया लाटेत आत्तापर्यंत तीन हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सोरेन म्हणाले, ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. ग्रामीण भागात कोरोना चाचणी केंद्रे उभारली जाणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी रॅपीड अ‍ॅँटीजेन टेस्टही करू शकणार आहेत.

बाधित रुग्णांना गरज पडल्यास आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे. आत्तापर्यंत २२ लाख कोरोना चाचणी किट वितरित करण्यात आली आहे. केंद्राकडून आणखी ४५ लाख किटची मागणी करण्यात आली आहे.

Jharkhand Chief Minister Hemant Soren informed that the government will pay for the funeral of corona death

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात