जग्गी वासुदेव यांच्यावर भोंदू असल्याचा तामीळनाडूच्या अर्थमंत्र्यांचा आरोप, इशा फाऊंडेशनवरही केली टीका

अध्यात्मिक गुरू आणि इशा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष जग्गी वासुदेव हे भोंदू असल्याचा आरोप तामीळनाडूचे नवनिर्वाचित अर्थमंत्री पी. ठिगा राजन यांनी केला आहे. जग्गी वासुदेव हे प्रसिध्दीचे भुकेले असून त्यासाठी काहीही करू शकतात असेही राजन यांनी म्हटले आहे.Tamil Nadu Finance Minister accuses Jaggi Vasudev of being a liar, criticizes Isha Foundation


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : अध्यात्मिक गुरू आणि इशा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष जग्गी वासुदेव हे भोंदू असल्याचा आरोप तामीळनाडूचे नवनिर्वाचित अर्थमंत्री पी. ठिगा राजन यांनी केला आहे. जग्गी वासुदेव हे प्रसिध्दीचे भुकेले असून त्यासाठी काहीही करू शकतात असेही राजन यांनी म्हटले आहे.

राजन यांनी ‘हिंदू’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जग्गी वासुदेव यांच्यावर टीका केली आहे. मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे देण्याची मागणी करणारे हे तथाकथित धर्मगुरू महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाची तिकिटे पाच हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत का विकतात?हे धर्मगुरूचे लक्षण आहे का? असा सवाल करत राजन म्हणाले ईश्वराचाही त्यांनी व्यापार केला आहे. धर्माचा व्यावसायिक कारणासाठी वापर करत आहेत.

तामीळनाडूच्या सरकारकडे येथील सर्व मंदिरांचे व्यवस्थापन आहे. हे व्यवस्थापन मंदिर समिती आणि भक्तांकडे द्यावे अशी मागणी विविध पक्ष आणि जग्गी वासुदेव यांच्या इशा फाऊंडेशनने केली आहे.

यावर प्रश्न विचारल्यावर राजन यांनी थेट जग्गी वासुदेव यांच्यावर हल्लाबोल केला.राजन यांच्या या आरोपांनंतर इशा फाऊंडेशनच्या भक्तांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.

तामीळनाडूमधील या संस्कृतीचे आणि राजकारणाच्या खालावलेल्या स्तराबाबत भक्तांनी चिंता व्यक्त केली. एका लोकनियुक्त लोकप्रतिनिधीला हे शोभत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

जग्गी वासुदेव यांच्यासारख्या माणसावर मंत्र्याने खालच्या भाषषत टीका करावी आणि त्यांच्यावर वैयक्तिक लांछन लावणे संतापजनक आहे. राजन यांच्यासारख्या मंत्र्याने जग्गी वासुदेव यांंच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीवर टीका केल्याने मानवतेच्या सेवेसाठी अवितरपणे कार्यरत असलेले जगभरातील इशा फाऊंडेशनचे कार्यकर्ते संतप्त आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Tamil Nadu Finance Minister accuses Jaggi Vasudev of being a liar, criticizes Isha Foundation