तामीळनाडूच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी अम्मा जयललिताच, गुढ मृत्यू बनलाय प्रचाराचा मुद्दा

तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा मृत्यू झाल असला तरी यंंदाच्या निवडणुकीतही त्याच केंद्रस्थानी आहे. दु्रमुक आणि अण्णा द्रुमुक या दोन्ही प्रमुख पक्षांनी जलललितायांचा गुढ मृत्यू प्रचाराचा मुद्दा बनविला आहे.Amma Jayalalithaa at the center of Tamil Nadu elections, the mysterious death has become a campaign issue


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा मृत्यू झाल असला तरी यंंदाच्या निवडणुकीतही त्याच केंद्रस्थानी आहे. दु्रमुक आणि अण्णा द्रुमुक या दोन्ही प्रमुख पक्षांनी जलललिता यांचा गुढ मृत्यू प्रचाराचा मुद्दा बनविला आहे.

पाच वर्षांपूर्वी जयललिता यांचा ७५ दिवसांच्या उपचारानंतर गूढ मृत्यू झाला होता. सत्ताधारी एआयएडीएमके व विरोधी डीएमके हे दोन्ही पक्ष हा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. डीएमके सातत्याने एक आश्वासन देत आहे.सत्तेवर आल्यानंतर एक वर्षात मृत्यूच्या रहस्याचा तपास केला जाईल. मुख्यमंत्री पलानीसामी यांनी प्रचारादरम्यान डीएमकेच अम्मांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. डीएमकेच्या स्टॅलिन यांनी पलटवार करताना ईपीएसला आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे खुले आव्हान दिले आहे.

मृत्यूच्या तपासासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या आयोगाचा कार्यकाळ दहाव्यांदा वाढवण्यात आला. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील आयोगाने तीन महिन्यांत अहवाल देणे अपेक्षित होते. आता स्टॅलिन आपल्या सभांतून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यावर मृत्यूवरून सत्य दडवण्याचा आरोप करू लागले आहेत.

जयललिता यांना २ डिसेंबर २०१६ रोजी डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा ५ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. वास्तविक सायंकाळच्या बुलेटिनमध्ये प्रकृतीत सुधारणा होणे आणि लवकरच डिस्चार्ज केला जाईल, असे सांगितले होते. त्यात ७५ दिवस रुग्णालयात दाखल होत्या.

जयललिता यांच्या जवळच्या मैत्रीण असणाऱ्या शशिकला यांच्यावर औषधींचा ओव्हरडोस, स्लो पॉयझन देण्याच्चा आरोप आहे. तामिळनाडूच्चे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी शशिकलांना पक्षातून बाहेर करून तीन महिन्यांत तपास आयोगाची स्थापना केली.

तीन वर्षांनंतरही काहीही स्पष्ट झाले नाही.अपोलो रुग्णालयाचे अध्यक्ष प्रतापसिंह रेड्डी हे देखील संशयाच्या भोवºयात आहेत. अपोलो रुग्णालयाच्या आयसीयूचे कॅमेरे बंद होते. ते कोणाच्या सांगण्यावरून बंद होते हे रहस्यही अद्याप उलगडलेले नाही.

Amma Jayalalithaa at the center of Tamil Nadu elections, the mysterious death has become a campaign issue

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*